जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या वतीने आयुक्तांचा निषेध..

पुणे: – पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैशाचा गैरवापर करत परकीय व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी केला जात आहे. पुणेकर करदात्यांच्या नशिबी रोजच हाल अपेष्ठा महापालिकेच्या वतीने होत आहेत. आज शहरात अनेक ठिकाणी पथदिवे व्यवस्थित काम करत नाहीत. तर काही ठिकाणी झाडांची राजरोसपणे कत्तल झालेली पाहायला मिळते. महापालिकेने हेच पैसे जर शहरामध्ये ठिकठिकाणी चौकात झाडे लावली तर उन्हाळ्यामध्ये वाहनधारकांना किमान त्या झाडांची सावली तरी मिळेलच त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन देखील होईल याची जाण पालिकेला होत नसल्याने संताप निर्माण होत आहे. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ मेकअप करून प्रश्न सुटणार नाहीत. पुणेकरांचा पैसा वापरताना पर्यावरण आणि पुण्याचा शाश्वत विकासाचा विचार करण्याची विनंती आम आदमी पक्षाच्या बचत गट विभागच्या शहर महिला संघटक सिमा गुट्टे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना केली. यावेळी वैशाली डोंगरे, गणेश तारळेकर उपस्थित होते.

जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील ६० चौक आणि चौकात बेटे यांचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावेत. ते नादुरूस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पथदिव्यांच्या खांबांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. सुशोभिकरणाचाच एक भाग म्हणून विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर विजेचा झगमगाट असलेली कृत्रिम झाडे उभारली जाणार आहेत. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेत्त्वावर घेतली जाणार आहेत. एका झाडावर १८० वॅटचे बल्न असून, एका झाडासाठी १५ ते २० हजार रुपये भाडे जाणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्याचा निषेध आपतर्फे करण्यात आला.

Leave A Reply

Translate »