महापालिका निवडणूक पार पडताच भाजप ॲक्शन मोड वर, दोन पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडताच भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, प्रभाग क्रमांक २४ कसबा कमला नेहरू, के.ई.एम. हॉस्पिटल परिसर येथे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत निर्णयांना धाब्यावर बसवत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उज्वला गौड यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रभागातील पदाधिकारी यश वालिया यांची देखील भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उचललेले हे पाऊल म्हणजे बंडखोरी, गटबाजी आणि पक्षविरोधी हालचालींना थेट इशारा असल्याचे मानले जात असून, आगामी काळात अशा प्रकारच्या कारवायांवर आणखी कठोर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.

Translate »