ओप्पो इंडियाने प्रीमियम रेनो१५ सिरीज केली लाँच
उत्साही प्रवाशांसाठी डिझाइन केलेल्या ओप्पो रेनो १५ प्रो ५जी आणि ओप्पो रेनो १५ प्रो मिनी ५जी मध्ये विविध प्रवासी फोटोग्राफीसाठी बनवलेला २०० एमपी अल्ट्रा-क्लीअर मेन कॅमेरा विशेष आकर्षण आहे.
पुणे : ओप्पो इंडियाने आज त्यांची प्रीमियम रेनो१५ सिरीज लाँच केली, त्यामध्ये रेनो१५ प्रो, रेनो१५ प्रो मिनी आणि रेनो१५ ही तीन प्रकारची विशेष आकर्षणे आहेत. तरुण प्रवासी आणि उत्साही फोटोग्राफरसाठी तयार केलेल्या या सिरीजमध्ये प्रगत कॅमेरा सिस्टम, बुद्धिमान एआय आणि अचूक डिझाइनचे मिश्रण आहे. नैसर्गिक घटकांनी प्रेरित रंगीत फिनिश आणि अशा प्रकारच्या पहिल्या प्रकारच्या होलोफ्यूजन तंत्रज्ञानासह, रेनो१५ सिरीजमध्ये कॉम्पॅक्ट, एर्गोनॉमिक फॉर्म फॅक्टर आणि दणकट बिल्ड क्वालिटी आहे. रेनो१५ प्रो आणि रेनो१५ प्रो मिनी २०० एमपी कॅमेरासह फोटोग्राफीला पुढे जात असून त्यामध्ये स्तंभित करणारी क्लॅरिटी आहे. त्याच्या जोडीला ५० एमपी ३.५ एक्स ऑप्टिकल झूम लेन्स, १२० एक्स पर्यंत डिजिटल झूम, प्युरटोन इमेजिंग टेक्नॉलॉजी आणि एआय एडिटिंग टूल्सही आहेत.
रेनो१५ सिरीजच्या लाँचबद्दल बोलताना ओप्पो इंडियाचे कम्युनिकेशन्स प्रमुख गोल्डी पटनायक म्हणाले, “भारतात १० कोटींपेक्षा अधिक ओप्पो वापरकर्ते आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा प्रीमियम अनुभवांच्या दिशेने, विशेषतः कॅमेरा सिस्टम, अंतर्ज्ञानी एआय, विशिष्ट डिझाइन भाषा आणि वापरकर्ता अनुभवाच्या दिशेने, कशा विकसित झाल्या आहेत हे आम्ही जवळून अनुभवले आहे. रेनो सिरीजची सातत्यपूर्ण वाढ ही या ट्रेंडसाठी आमची कटिबद्धता आहे कारण ग्राहक किरकोळ अपग्रेडपेक्षा वास्तव जगातील मूल्य देणारी उपकरणांच्या शोधात आहेत. रेनो१५ सिरीजद्वारे आम्ही त्या विश्वासावर उभारी घेत असून लक्षणीयरीत्या प्रगत इमेजिंग सिस्टम, सखोल एआय क्षमता आणि मजबूत अष्टपैलू कामगिरी देत आहोत. तरुण भारतीय कसे प्रवास करतात, त्यांचे क्षण कसे तयार करतात आणि कॅप्चर करतात यानुसार त्यांची रचना करण्यात आली आहे.”
रेनो१५ प्रो हा समुद्राला द्रवरूप सोन्याच्या चादरीत बदलणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळेसच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सोनेरी रंगछटांनी प्रेरित अशा सनसेट गोल्ड रंगात आणि चहा व कॉफीच्या उबदारतेमध्ये मूळ असलेल्या कोको ब्राउन रंगात येतो. रेनो१५ प्रो मिनीमध्ये कोको ब्राउन रंग कायम आहे. त्यात होलोफ्यूजन तंत्रज्ञान आणि क्रिस्टल पिंक प्रकाराद्वारे साध्य केलेला त्रिमितीय रिबन पॅटर्न हे खास आकर्षण असलेला ग्लेशियर व्हाइट रंग आणि आणि क्रिस्टल पिंक प्रकाराची भर पडली आहे. रात्रीचे आकाश आणि ऑरोरासारख्या घटनांमधून प्रेरणा घेतलेल्या ग्लेशियर व्हाइट, ट्वायलाइट ब्लू आणि ऑरोरा ब्लूसह रेनो१५ची लाईनअप पूर्ण होती.
किंमत आणि उपलब्धता*
रेनो१५ प्रोच्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ६७,९९९ रुपये आणि १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आहे. रेनो१५ प्रो मिनी १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये आणि १२जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. दरम्यान, रेनो१५ तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे, ८ जीबी + २५६ जीबी ४५,९९९ रुपये, १२ जीबी + २५६ जीबी ४८,९९९ रुपये आणि १२ जीबी + ५१२ जीबी ५३,९९९ रुपये.
ओप्पो रेनो१५ सीरीज अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मेनलाईन रिटेल आऊटलेट्स आणि ओप्पो ई-स्टोरमध्ये आकर्षक ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Comments are closed.