विजयानंतर आता विकास अजेंड्यावर, गणेश बिडकरांची महापालिका आयुक्तांशी विकासकामांवर चर्चा

पुणे: महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक २४ मधून विजयी झालेले भाजप नगरसेवक व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे. विजयाचा जल्लोष बाजूला ठेवत बिडकर यांनी प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत थेट पुणे महापालिकेचे आयुक्त कार्यालय गाठले.

प्रभाग २४ मधील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांची सविस्तर यादी घेऊन गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीला प्रभागातून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला यादव आणि कल्पना बहिरट हे देखील उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्यात आला.

 

यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “निवडणुकीत मिळालेला विजय हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असला तरी खरी जबाबदारी आता सुरू झाली आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रभागासह पुणेकरांच्या मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य देणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे.”

Comments are closed.

Translate »