देशात १.८ लाख मूत्रपिंड निकामी झालेले रूग्ण असून त्यातील केवळ ६००० रुग्णांचे होतेय प्रत्यारोपण

– डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इंडियाची माहिती
– ब्रेन-डेड व्यक्तीच्या अवयवदानाविषयी जागरुकता वाढवण्याची आवश्यकता

पुणे : देशात १.८ लाख मूत्रपिंड निकामी झालेले रूग्ण असून त्यातील केवळ ६००० रुग्णांचे होतेय प्रत्यारोपण होते, अशी माहिती डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इंडियाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रेन-डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानाचे महत्व समजून घेत ब्रेन-डेड व्यक्तीच्या अवयवदाना विषयी जागरुकता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि  युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास पी. साबळे यांनी सांगितले.जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर ऑफ नेफ्रॉलॉजी डॉ.पवन वाखारे देखील उपस्थित होते.
सामान्यतः मूत्रपिंडे लघवी तयार करतात या लघवीमधे अनावश्यक पदार्थ, क्षार, खनिजे आणि चयापचयातील अंतिम घटक असतात. यामुळे शरीरातील पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, रक्तातील क्षारांचे नियंत्रण केले जाते आणि युरियासारखे चयापचयातील हानिकारक घटक लघवीतून बाहेर टाकले जातात. याव्यतिरिक्त किडनीमध्ये काही संप्रेरक (HORMONE) तयार होते. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी महत्त्वाचे असते. हिमोग्लोबिन हे लाल रक्त पेशीतील मेंदूसह शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी आवश्यक असते.
किडनी काम करत नसल्यास जीव धोक्यात येऊ शकतो. यालाच सर्वसामान्यपणे किडनी फेल्युअर (मूत्रपिंड निकामी होणे) असे म्हणतात. ही अचानक घडणारी (ACUTE RENAL FAILURE) किंवा काही आजारांमध्ये दिर्घकालीन नुकसान झाल्यामुळे हळुहळु घडणारी (CHRONIC RENAL FAILURE) प्रक्रिया आहे. हा आजार जडल्यास जगण्यासाठी रुग्णाला नियमित डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.
मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण देण्यात मोठ्या संख्येने आहेत. त्यातील खूप कमी रुग्णांना नात्यातील योग्य मूत्रपिंड मिळण्याची श्यक्यता असते. अत्यल्प मूत्रपिंड दात्यांमुळे अश्या रुग्णांना मूत्रपिंड उपलब्धतेत अडचण येते. यावर उपाय म्हणून अंतरराष्ट्रीय पातळीवर मेंदू-मृत (ब्रेन-डेड) ही शास्त्रीय संकल्पना स्वीकारली आहे. आपल्या समाजाने ही संकल्पना स्वीकारल्यास आणि ब्रेन-डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानाचे महत्व समजून घेतल्यास ही कमतरता भरून येईल. याबाबतची योग्य व शास्त्रीय माहिती समाजापुढे येणे आवश्यक आहे.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये  आत्तापर्यंत १२० मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यापैकी ३० प्रत्यारोपण हे मेंदूमृत रुग्णांचे आहेत. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इंडियाच्या मते, भारतात दरवर्षी अंदाजे १.८ लाख मूत्रपिंड निकामी झालेली रूग्णसंखेची नोंद आहे. मात्र वार्षिक मुत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या केवळ ६००० आहे.कोविड येण्यापूर्वी ही संख्या दहा हजार पर्यंत गेली होती त्यामुळे दरवर्षी देशभरातील किडनी फेल्युअर रुग्णांसाठी अंदाजे १,७४,००० मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वास्तविक कमतरता आहे, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

Leave A Reply

Translate »