चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता. यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्युट या भोवती गुंफन्यात आलेला होता.
एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम,चिंचवड, पुणे येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू पराग काळकर, विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदिप कदम,प्राचार्य डॉ.संगीता व्ही. जगताप, विभागप्रमुख प्रा.प्रिती सदाशिव जोशी, ज्युरी दीपाली जोशी, पूजा वाघ, प्राजक्ता साळवे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथळकर,डॉ नितीन घोरपडे, डॉ देविदास वायदंडे,डॉ.डी.बी. पवार, संदीप पालवे, प्राचार्य पंडित शेळके, डॉ तुषार शितोळे, डॉ. शर्मिला चौधरी, डॉ अंजली काळकर, सरोज पांडे,योगेश पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
संदीप कदम म्हणाले, मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना फक्त व्यासपीठ मिळवून न देता त्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्री शी जोडण्याचे काम आम्ही या शो च्या माध्यमातून करत आहोत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य , प्राचार्य डॉ संगीता जगताप म्हणाल्या, अलीकडे एक दोन महीने कपडे वापरुन नवीन ट्रेंडचे कपडे वापरण्याकडे कल असतो. मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी ज्युट आणि खादी यातून आधुनिक कपडे निर्माण केले आहेत. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत, यातूनच मुलांना भविष्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
विभागप्रमुख प्रा. प्रीती सदाशिव जोशी म्हणाल्या, आमच्याकडे विविध कोर्सेस चालतात, हा फॅशन शो पदवीच्या विद्यार्थ्यांचा आहे. एका थीम वर रिसर्च करून या शो मध्ये सादरीकरण केले जाते. आजच्या शो मध्ये ज्युट ला पारंपारिकता जपत मॉडर्न लुक दिल्याचे बघायला मिळते
या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या वद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख प्रा प्रीती सदाशिव जोशी, वीणा करांडे, फातेमा सय्यद, अंजली बोंद्रे, ऋतुजा पाटसकर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले.
फॅशन शो स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सर्वोत्तम संग्रह श्रेणी 2 क्रम – कार्निवल्स ऑफ कलर्स
1) मोहिनी खेमनार
२) समिक्षा नवले
3) रोनीत तिकोणे
अनुक्रम – अर्थ एलिगन्स
1) आकांशा आखाडकर
२) कावेरी हिवरेकर
3) दीपाली गायकवाड
4) दिव्या पवार
सर्वोत्कृष्ट डिझाइन पुरस्कार
अनुक्रम – स्टिचरी फ्लोरेन्स
1) निवेदिता चव्हाण
२) स्मिता पडुल
3) अवंतिका मगरे
क्रम – लँड्स ऑफ डेनिम
१) मनीषा कोरे
२) कल्याणी गोसावी
3) सायली सरादे
सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्कार
क्रम – ट्रीब ट्विस्ट
1) तन्वी बिबावे
२) दिपाली चव्हाण
ज्युरी विशेष पुरस्कार
देसी चार्म खादी
सर्व MVoc PG विद्यार्थी