मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे तर्फे आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीचा शुभारंभ

पुणे – शहरातील नामवंत मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखी एक मैलाचा दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली आहे. या प्रणालीमुळे आता गुडघा बदल (क्नी रिप्लेसमेंट) यांसारख्या शस्त्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि रुग्णासाठी सोयीस्कर होणार आहेत.
या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विलास लांडे (माजी आमदार), मा. आमदार श्री. महेश दादा लांडगे (भोसरी), श्री. विलास मडेगिरी (नगरसेवक, संबंधित प्रभाग) आणि मेडिकव्हर हॉस्पिटलचे रीजनल हेड श्री. नीरज पाल हे उपस्थित होते.
आमदार महेश दादा लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडसारख्या गतिमान शहरात आरोग्यसेवा ही अधिक सुलभ, आधुनिक आणि विश्वासार्ह असावी, हीच आपली अपेक्षा असते. मेडिकव्हर हॉस्पिटलने ही अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करून नागरिकांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा परिसरातील अनेक रुग्णांना होईल, याची खात्री वाटते.”
श्री. विलास मडेगिरी म्हणाले, “मेडिकव्हर सारख्या संस्थांमुळे आपल्या परिसरात दर्जेदार आणि प्रगत वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. ही प्रणाली अनेक नागरिकांसाठी जीवन बदलणारी ठरणार आहे.”
श्री. नीरज पाल (रीजनल हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल) म्हणाले, “मेडिकव्हरचे ध्येय नेहमीच रुग्णकेंद्रित आणि तांत्रिक दृष्टिकोन ठेवून उपचार देणे हेच राहिले आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली ही केवळ तंत्रज्ञानाची जोड नाही, तर रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने एक नवे पर्व आहे. आमच्या पुणे युनिटमध्ये ही प्रणाली सुरु झाल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
नवीन रोबोटिक प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया अचूकतेने आणि नियंत्रित पद्धतीने करता येते. शस्त्रक्रियेआधी संपूर्ण नियोजन करता येते, जेणेकरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि यशस्वी होते. यामुळे रुग्णाला लवकर रिकव्हरी मिळते आणि शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्ण चालू शकतो, ही या तंत्रज्ञानाची खासियत आहे.

ही प्रणाली सर्व प्रकारच्या गुडघा शस्त्रक्रियांमध्ये वापरता येते, ज्यात पारंपरिक गुडघा बदल, अर्धगुडघा शस्त्रक्रिया आणि कॉम्प्लेक्स केस देखील समाविष्ट आहेत.
मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. व्यास मौर्य म्हणाले, “ही रोबोटिक प्रणाली आमच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तिच्या साहाय्याने आम्ही आणखी अधिक अचूक आणि जलद सेवा देऊ शकू.”
रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. राहुल गागरे म्हणाले, “रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आमच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात. रुग्णासाठी वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा रोबोट संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या नव्या प्रणालीमुळे आम्ही जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया पुण्यात उपलब्ध करून देत आहोत.”

Leave A Reply

Translate »