फ्लेम बॉइज ने पटकावला पुणे ट्राईब – सिझन १ चषक.


पुणे ट्राईब तर्फे पुण्यातील कल्याणी नगर येथे एक दिवसीय बॉक्स क्रिकेट सामन्याचे आयोजन उत्साहात संपन्न

पुणे – पुणे ट्राईब तर्फे कल्याणी नगर येथील एनफिल्ड अरेना येथे नुकतेच एक दिवसीय बॉक्स क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकी ७ खेळाडू असलेले ट्राईब ब्लास्टर, फ्लेम बॉईज, सेव्हन ॲव्हेंजर, पी टी स्मॅशर्स, रॉयल हीटर्स आणि सेव्हन स्टार्स हे ६ संघ मैदानात उतरले होते. त्यांच्यात १५ चुरशीचे सामने पार पडले. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यानुसार ठरलेले सामनावीर निवडण्यात आले. त्यामधे सर्वोत्तम फलंदाज अर्जुन जिवनानी, सर्वोत्तम गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक रितेश कामडी, सर्वात मौल्यवान खेळाडू मंगेश शुक्ल यांचा समावेश आहे. अंतिम सामना फ्लेम बॉईज आणि पी टी स्मॅशर्स यांच्यात खेळला गेला. पी टी स्मॅशर्सनी ६ षटकांत ५६ धावा केल्या. फ्लेम बॉईजने पाठलाग करत शेवटच्या चेंडूवर ४ धावा करत  विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यातील कर्णधार आणि फ्लेम बॉईज संघाचे मालक मृणाल चड्ढा हे सामन्याचे मानकरी ठरले. 

वन स्टॉप सोल्यूशन्स तर्फे रोख बक्षीस १५,००० रू. आणि पुणे ट्राईब चषक फ्लेम बॉईज संघास देण्यात आला तर पी टी स्मॅशर्स या उपविजेता संघास उद्योजक दिलीप गुप्ता यांच्या डॉल्फिन ग्रूप कडून रोख रक्कम ११,००० रू. आणि चषक बहाल करण्यात आला. या एक दिवसीय सामन्याचे संयोजन अमित कर्माकर, श्वेता कोठारे, स्वाती अजित, सायली तेल्हारकर, मृणाल चड्ढा, शर्मिष्ठा बी.एन, कार्तिक कुमार, हितेन ठक्कर आणि  मुबारक मुल्ला यांनी केले होते. पुणे ट्राईब हे समाज माध्यमातून एकत्र आलेले तिशीच्या पुढच्या वयोगटातील महिला आणि पुरुषांचा समावेश असलेले एक  मित्र मंडळ असून या द्वारे वर्ष भर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून कामाचा ताणतणाव कमी करण्यासह खेळ भावना जागृत करणे, आपसातील हितसंबंध दृढ करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचा उद्देश असल्याचे मित्रमंडळाचे संस्थापक अमित कर्माकर यांनी  सांगितले.

Leave A Reply

Translate »