राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे खाजगी विद्यापीठे व खाजगी महाविद्यालयातील  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पुण्याच्या समाज कल्याण आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन

पुणे -राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे खाजगी विद्यापीठे व खाजगी महाविद्यालयातील  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पुण्याच्या पुणे स्टेशन येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज  खाजगी विद्यापीठ, खाजगी महाविद्यालये व व्होकेशनल इन्स्टिट्यूट  यांनी अजून भरून घेतलेले नाहीत. तसेच 7  जुलै 2023 चा  खाजगी विद्यापीठांचा शासन निर्णय असताना देखील  सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण संचालनालयाने खाजगी विद्यापीठे, खाजगी महाविद्यालय,  वोकेशनल इन्स्टिट्यूट यांना अजून आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो  विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अभावी भविष्य अधांतरी आहे. सध्या शैक्षणिक वर्ष संपत आलेले असेल तरीसुद्धा  समाज कल्याण संचालनालय व खाजगी विद्यापीठे खाजगी महाविद्यालये व व्होकेशनल इन्स्टिट्यूट यांनी  शिष्यवृत्ती चे अर्ज भरून घेतलेले नाहीत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार  यांच्यातर्फे  शिष्यवृत्ती बाबत पाठपुरावा करण्यात आला. याविषयीचे निवेदन  समाज कल्याण संचालनालयाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या  पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी पुण्याच्या समाज कल्याण आयुक्तलयाच्या कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची खाजगी विद्यापीठ व खाजगी  महाविद्यालयात त्वरित अंमलबजावणी  करण्यात यावी अशी एक मुखी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस  (शरदचंद्र पवार ) पक्षातर्फे करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार , युवक प्रदेश सचिव ॲड.सुमेध गायकवाड, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अमोल कुंभार, संकेत खाडे, ॲड.अशोक माने, विशाल घोडके, अभिषेक शेवाळे, गणेश मसुरकर, ऋषिकेश मुगळे, बी आर गायकवाड,संकेत वाघ उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »