मदरहूड हॉस्पिटल व खराडी महिला संघटनेच्यावतीने वंचित महिलावर्गाकरिता मोफत आरोग्य तपासणी

मातांचे ब्लड शुगर, रक्तदाब आणि थायरॉईड तपासणी तर बाळांची उंची, वजन आणि डोळे, नाक, कान विकासात्मक वाढीचे केले परिक्षण

पुणे : ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना झाली आणि दरवर्षी हा संस्मरणीय दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना  “निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य” (Healthy Start, Hopeful Future) अशी असून माता आणि नवजात शिशूचे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, गर्भधारणेपासून बाळंतपण आणि त्यानंतर ही काही काळ या दरम्यान चांगल्या सेवा पुरवठांची आवश्यकता अधोरेखित करणे हा यामागचा उद्देश आहे. खराडी येथील मदरहूड हॉस्पिटल व खराडी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल रोजी महिला कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात वंचित समुदायांसाठी वेळीच निदान आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यक्रमातंर्गत खराडी आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या वंचित समुदायातील महिलांना निरोगी राहण्यास राहण्याकरिता जागरुक करत प्रजनन आरोग्याविषयी शिक्षित करण्यात आले.

या शिबिरात नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, विशेषतः महिला आणि मुलांसाठी ज्यांना अनेकदा योग्य आरोग्य सुविधा मिळत नाहीत.मोललमजुरी करणाऱ्या समुदायातील महिला आणि मुलांना विविध आरोग्य समस्यांबद्दल फारशी माहिती नसते आणि बऱ्याचजदा वेळेवर वैद्यकिय सेवा न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य पोषणाच्या अभावाने, वेळीच वैद्यकीय सुविधा न मिळल्याने आणि आरोग्य स्थितीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे अशक्तपणा, उच्च रक्तदाब, कमी वजनाच्या महिलांमध्ये थायरॉईड समस्या आणि मुलांमध्ये विकासात्मक समस्या यासारख्या गुंतागुंत निर्माण होतात. या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती मिळाली ज्यामुळे त्यांना भविष्यातील आरोग्य समस्यांना दूर करता येईल.

पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटल्सचे फॅसिलिटी डायरेक्टर श्री. कनिष्क पी. झा सांगतात की, अनेक वंचित मातांची गर्भधारणेदरम्यान आणि गर्भधारणेनंतर योग्य काळजी घेतली जात नाही. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही टाळता येण्याजोग्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे वैद्यकिय समस्येचे वेळीच निदान  तर  होते मात्र त्याचबरोबर महिलांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याासाठी शिक्षित आणि सक्षम केले जाते. या महिलांना त्यांच्या किंवा बाळाच्या आरोग्याबाबत शंका दूर करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला.  या उपक्रमात स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग दिसून आला, ज्यामुळे महिलांना प्रश्न विचारण्यासाठी आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी कोणताही संकोच बाळगावा लागला नाही. षा अनोख्या उपक्रमाबाबत उपस्थित महिलावर्गाने कृतज्ञता व्यक्त केली.

मदरहूड हॉस्पिटल आणि खराडी महिला संघटनेच्या सहकार्याने नेहमीच समाजाला, विशेषतः प्रत्येक कुटुंबाच्या आधारस्तंभ असलेल्या महिलांना पाठिंबा देण्यात आला आहे. अशा उपक्रमांद्वारे, आम्ही प्रत्येक आईला आवश्यक काळजी आणि उपचार मिळावे याची खात्री करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रुग्णालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करतो आणि भविष्यातही आम्ही अशाप्रकारचे उपक्रम राबवू. एकत्रितपणे, आपण महिला आणि मुलांसाठी एक निरोगी आणि जागरुक समुदाय निर्माण करण्यासाठी काम करू शकतो अशी प्रतिक्रिया खराडी महिला संघटनेचे सदस्य डॉ. एचसी सरवजीत किराड यांनी व्यक्त केली

Leave A Reply

Translate »