त्या कंपनीकडूनही राज्य सरकारला पैसे वसूली करायचे होते का?

ज्या कंपनीने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्याच कंपनीच्या लोकांना मंत्र्यांचा ओएसडी फोन करून दम देतो, त्या कंपनीकडूनही राज्य सरकारला पैसे वसूली करायचे होते का? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय. ब्रूक फार्मा कंपनी प्रकरणावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय.

या संदर्भात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सरकारच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, ‘एका बाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा. रेमडेसिवीर अभावी रोज माणसं तडफडून मरताहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने एफडीएची परवानगी घेतली. त्याच कंपनीच्या माणसांना पोलीस उचलतात. सरकारच्या हलगर्जीपणाची शिक्षा जनतेने का भोगावी यासाठी ब्रुक फार्माला रेमडेसीवीर देण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली. त्यासाठी एफडीएची परवानगी मिळवून दिली. ब्रुक फार्मा महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनची मदत करणार होते. त्याच कंपनीच्या लोकांना मंत्र्यांचा ओएसडी फोन करुन दम देतो?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Translate »