शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्या बांधावर

हिंगोली : विशेष प्रतिनिधी

हिंगोली : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी अजित मगर यांच्या कळमनुरी दौऱ्याला सुरवात झाली आहे हिंगोली जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी कळमनुरी तालुक्यातील तुप्पा, डोंगरगाव, बाबळी, गंगापूर आदि गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकरी सध्या मोठ्या संकटात असताना शेतकऱ्यावर एकामागून एक संकट ओढावत असताना शेतकऱ्यांचे कैवारी अशी ओळख असलेले अजित मगर यांनी चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीन ची पाणी केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात संबंधित कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी बोलताना अजित मगर त्यांनी व्यक्त केले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख निर्माण झालेले जिल्हा परिषद सदस्य अजित मगर हे दररोज नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Translate »