हैद्राबाद चे सलग ३ पराभव; व्ही व्ही एस लक्ष्मण याची नाराजगी

आयपीएल स्पर्धा सुरु होऊन दहा दिवसाचा कालावधी झाला आहे. या दहा दिवसात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ३ वेळेस परावभावाच्या सामोरे जावे लागले. पराभव झालेल्या तिनही सामन्यात हैदराबाद संघ धावांचा पाठलाग करत होता. चांगली सुरुवात करुनही तिन्ही सामन्यात हैदराबादला पराभवाचे तोंड बघावे लागले.

यावरच संघाचा मेंटॉर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने नाराजगी व्यक्त केली आहे. आणि त्याने संघाला चांगलचं झापलं आहे. तो म्हणाला, त्यांनी चेपॉकच्या विकेटवर जेव्हा मोठे फटके मारता येत नाहीत आणि नुसताच पाय पुढे टाकून बॅट फिरवता येत नाही, तेव्हा मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा काढण्याचे तंत्र यायलाच हवे. स्ट्राईक रोटेट करता यायला हवा. त्याचबरोबर निर्धाव चेंडूंची संख्या कमी करता यायला हवी. हाच एक चांगला उपाय आणि जो राबवणे अशक्य नक्कीच नाही.

पुढे तो म्हणाला, ७-८ षटकांनंतर चेंडू काहीसा जुना झाल्यावर मोठे फटके मारणे कठीण होत आहे, मग उपाय काय आहे? पहिल्या काही षटकात चेंडू नवा असताना तो बॅटवर पटकन येतो, त्यावेळी मोठे फटके मारायचे आणि नंतर एकेरी-दुहेरी धाव पळून काढायचा, हाच विजयाचा फॉर्म्युला आहे. अजून स्पर्धेची सुरुवात आहे म्हणून चुका सुधारायला अजून वेळ आहे, चुका करणे टाळले पाहिजे, असे लक्ष्मणने सांगितले आहे.

Leave A Reply

Translate »