पुणे :पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी गुरुवारी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांनी सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून, स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग शीघ्रगतीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
हिरा हे निवडणूक चिन्ह असलेल्या आबा बागुल यांनी आज नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वर भर दिला. यावेळी त्यांनी पर्वती मतदार संघ टँकर मुक्त करून सर्वांना वेळेवर पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विजयी झाल्यावर हा परिसर टँकर माफियामुक्त होईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
नेहमी नागरिकांच्या संपर्कात असलेल्या आबा बागुल यांची आज संदेश नगर येथील विद्यासागर सोसायटीच्या रहिवाश्यांनी भेट घेऊन येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी आबा यांनी हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल असे सांगितले. दरम्यान पर्वती मतदार संघातील कोणतेही प्रश्न असतील ते मला सांगा, तसेच आपल्या भागातील विकासाबाबत काही कल्पना असतील, अडचणी असतील त्या वाळवेकर लॉन्स येथील जनसंपर्क कार्यालयात आणून द्यव्यात, त्याचे निराकरण निवडून आल्यावर केले जाईल असे आवाहन आबा बागुल यांनी नागरिकांना केले.
पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल हे गेली ३२ वर्षे महापालिकेत अपराजित नगरसेवक आहेत. आपल्या प्रभागातील मूलभूत समस्यांचे निवारण त्यांनी केले आहे. याचबरोबर संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला हेवा वाटेल असे राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल, भारतरत्न भिमसेन जोशी कलादालन, १९७१ च्या युद्धावर आधारित म्युझिकल कारंजे व लेझर शो प्रकल्प यशस्वीरित्या राबविले आहेत.
Sign in / Join
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.