अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पटकावले पहिले स्थान

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘सरफिरा’ने प्रेक्षकांना त्याच्या आशयाने जबरदस्त प्रभावित केले आहे. ‘सरफिरा’ चित्रपटाने सर्वात उत्कंठावर्धक चित्रपट म्हणून आयएमडीबीच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला ‘सरफिरा’चा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाल्याच्या २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला.
आयएमडीबी च्या रेटिंगनुसार, ‘सरफिरा’ हा जुलै २०२४ चा सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट आहे. याने इंडियन 2 आणि बॅड न्यूज या चित्रपटांना मागे टाकत पाहिले स्थान पटकावले आहे.
‘सरफिरा’ चित्रपटात अक्षय कुमार एका अशा माणसाची भूमिका साकारत आहे जो कधीही हार मानत नाही आणि त्याच्यात स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आहे. ‘सरफिरा’ची कथा जीआर गोपीनाथ यांच्या वास्तविक जीवनातील व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे. ज्यांनी सामान्य माणसाला परवडणारे विमान उडवले. सुधा कोंगारा दिग्दर्शित आणि 5 राष्ट्रीय पुरस्कार-विजेत्या तमिळ चित्रपट सूराराई पोत्तूचे अधिकृत रूपांतर आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी लिहिलेले, संवाद पूजा तोलानी आणि जी.व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीतासह, सरफिराची निर्मिती अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), दक्षिण सुपरस्टार सूर्या आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट) आणि विक्रम मल्होत्रा (अबंडंटिया एंटरटेनमेंट) यांनी केली आहे. 12 जुलै रोजी देशभरात प्रदर्शित होणारा ”सरफिरा” आपल्या दमदार कथेने प्रेक्षकांना भुरळ घालण्याचे वचन देतो.

Leave A Reply

Translate »