दगडाने ठेचून खून केलेल्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर; ॲड. सुधीर पाटील यांचा प्रभावी युक्तिवाद

पुणे – बहिणीला अमानुषपणे मारहाण करून छळ केल्याच्या कारणावरून तिच्या भावाने मित्राच्या मदतीने मेव्हण्याचे डोके दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रूप करून खून केल्याचा प्रकार बाणेर येथे घडला होता. याप्रकरणी सतीश गिऱ्हे व त्याचा मित्र दिपक कोळेकर यांच्यावर चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संदीप शिंपी (रा. बाणेर) याचा निर्घृण खून झाला होता. परिस्थितीतीजन्य पुराव्याची साखळी तयार होत नसल्याने पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला. आरोपी दिपक कोळेकरने ॲड. सुधीर पाटील व ॲड. अर्जुन वाघमारे यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर पाटील यांनी न्यायालयापुढे असा युक्तिवाद केला कि, सरकारी पक्षाची संपूर्ण केस हि परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून सदर गुन्ह्यातील दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी तयार होत नाही. त्याचप्रमाणे सदर आरोपीनीच गुन्हा केल्याचे पाहिलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सरकारी पक्षाने न्यायालयासमोर आणलेला नाही. संपूर्ण दोषारोपपत्रात आरोपींचा सी.डी.आर. व एस.डी.आर. याचे अवलोकन केले असता तो घटनास्थळी दिसून येत नाही. सदर आरोपीनीच खून केल्याचे स्पष्ट आरोप साक्षीदारांच्या जबाबात कोठेही नमूद नाहीत. आरोपी व मयत यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता हे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून ॲड. सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत बी. साळुंखे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ॲड. सुधीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दिपक विठ्ठल कोळेकर यांना जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात ॲड. अर्जुन वाघमारे, ॲड. विशाल आबासाहेब वीर-पाटील व ॲड. कार्तिक दारकुंडे-पाटील यांनी सहकार्य केले.
——————————————————–
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक श्री. गणेश शंकर चौधर हे दिनांक २९/१२/२०२२ रोजी मार्शल ड्युटीवर असताना त्यांना एम.डी.टी. डिव्हाईस वर कॉल आला की पाषाण-बाणेर हायवे व्हिंटेज बिल्डींगजवळ, सुस खिंड, बाणेर पुणे येथे रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्ती पडलेला असून त्याचे डोके फुटलेले दिसत आहे सदर कॉल प्रमाणे पोलिस नाईक पेट्रोलिंग करत काय प्रकार आहे यांची पाहणी करत असताना एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे रक्तबंबाळ व बेशुद्ध अवस्थेत संशयितरित्या आढळून आल्याने सदर घटनेची माहिती पोलिसांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर व्यक्तिस दगडाचे सहाय्याने डोक्यावर गंभीर मारहाण झालेली दिसून आली व सदर व्यक्तीचा चेहरा देखील चेंबलेला दिसल्याने अज्ञात आरोपीने मयात इसमाची ओळख होऊ नये म्हणून दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप केल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संदीप शिंपी याचा खून त्याचा मेहुणा सतीश गिऱ्हे व दिपक कोळेकर यांनी संगनमताने केल्याचे समजले अधिक तपास केला असता तसे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दाखल घेवून आरोपी सतीश गिऱ्हे व दिपक कोळेकर यांचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांस अटक करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी वकीलानी आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला कि आरोपीनी संगनमत करून मयताचे डोके दगडाने ठेचून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करून अतिशय क्रूर व निर्दयीपणे खून केल्याचे न्यायालयात सांगितले. दोषारोपपत्रात आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहे त्याचप्रमाणे सदर घटना गंभीर असून त्यांना जामीन दिल्यास आरोपी सरकारी पुराव्यात छेडछाड करतील म्हणून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
—————————————————–

Leave A Reply

Translate »