एनसीसीच्या कॅडेट्सनी ७२ युनिट केले रक्तदानएमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये रक्तदान शिबिर

पुणे,दि. ८ एप्रिल: भारतीय सैन्य दलात नेहमीच रक्ताची गरज भासते असते. हीच गोष्ट लक्षात ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एनसीसी ट्रूफ व पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफ एमसी)यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेजर शाहीन खान भाटी यांच्या पथकाच्या देखरेखीखाली ७२ विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हे शिबिर सकाळी साडे नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होते.
एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी म्हणाले,“रक्त बनविले जात नाही, तर ते दान केल्यानेच मिळते. यामुळे आम्ही सरळ सरळ दुसर्‍यांना जीवनदान देतो. त्यामुळे रक्तदानाला महादान असे संबोधले जाते. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी प्रेरित केले. रक्तदान ही वेदनादायक क्रिया नाही. त्याने व्यक्तीच्या शरीरात अशक्तपणा येत नाही. कोणतीही निरोगी व्यक्ती तीन महिन्यांच्या अंतराने रक्तदान करू शकते.”
भविष्यात एमआयटी कडून असे शिबिर वर्षातून २ वेळा घेतले जाईल. असे ही प्रा. प्रकाश जोशी यांनी सांगितले.
अशा सेवा भावी कामासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन रक्तदानासाठी लोकांना प्रवृत्त करावे . असे मत विद्यापीठाच्या एनसीसीचे प्रमुख स्कॉडन लिडर डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. गणेश काकंडीकर व एएफएमसीचे १० कर्मचारी उपस्थित होते. शिबिरातील सर्व रक्तदात्यांना एएफएमसी कडून मेजर शाहीन खान भाटी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
या शिबिरला यशस्वी करण्यासाठी शिवम देशमुख, कृष्णा कपूर आणि श्रीहरी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.

Leave A Reply

Translate »