बोलता बोलता मणक्याची शस्त्रक्रियाः स्पाईन सर्जन डॉ. प्रमोद लोखंडे

कोथरूड हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : तुमचे आरोग्य, आमचे ध्येय या तत्वानुसार प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे हे व्रत धारण करून वैद्यकीय सेवा देणारे कोथरूड हॉस्पिटल ने दोन रुग्णांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे. पाठ व कंबर दुखीने त्रस्त झालेल्या रुग्णांनी येथे दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया करून या दुखण्याला कायमची तिलांजली दिली आहे.
मानेचे स्पॉन्डेलायसीस (बदललेले नाव आशिष, ३५ वर्षे ) व कंबरेच्या त्रासाने त्रस्त असलेल्या(बदललेले नाव मनिषा ४० ) दोन रुग्णांना पूर्णपणे बेशुध्द न करता त्यांच्यावर दुर्बिनद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तासांच्या ऑपरेशननंतर, नर्व्ह वर दाबणारी डिस्क व्यवस्तीत बसवून रुग्णाला या त्रासातून मुक्त केले. ही किमयाकोथरूड हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. प्रमोद लोखंडे व त्यांच्या टीम मधील भूलतज्ञ डॉ. दिप्ती पोफळे, अस्थीरोग तज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. निखील ओझा व डॉ. राजेंद्र मिटकर यांनी केली आहे.
मुळ कर्नाटकच्या बेळगांव येथील रहिवासी (बदललेले नाव मनिषा ४० ) यांना अनेक महिन्यांपासून कंबरदुखीचा भयंकर त्रास होता. त्या पाच मिनिटेही उभे राहू शकत नसे. वारंवार पायांच्या नसा लागणे, पायांना मुंग्या येणे, त्यामुळे चालणे फिरणे बंद झाले होते. कोणतेही वस्तू उचलता येत नसे. या रुग्णाने वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून उपचार केल्यानंतर ही त्यांना आराम मिळला नाही. शेवटी एका रुग्णाने दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यात येऊन कोथरूड हॉस्पिटलमध्ये चाचणी केली. कंबरेमध्ये स्लिप डिस्क आढळून आले . स्पाईन सर्जन डॉ.लोखंडे यांच्याकडे उपचार सुरू करून दुर्बिणीच्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याच प्रमाणे मानेच्या दुखण्याने त्रस्त रुग्णावरही यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली.
रुग्णाला जागचे जागी भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान रुग्ण जागरूक राहिला आणि डॉक्टरांच्या टीमशी बोलत राहिला. आता रुग्ण निरोगी आहे. दुर्बिणीची शस्त्रक्रिया ही अतिशय सुलभ असून यात इन्फेक्शन किंवा इतर साइड इफेक्ट होत नाहीत.

डॉ. प्रमोद लोखंडे म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीत १० जणांना पाठदुखीबद्दल विचारले तर किमान पाच जाणांना ही समस्या असते. चुकीचे चालणे,उठणे व बसण्याच्या सवयीमुळे लोकांच्या पाठीत दुखते. अनेकदा असे दिसून येते की पाठदुखी आणि मणक्याशी संबंधित आजारांमध्ये वेदना सुरू झाल्यानंतरही लोक कोणतेही उपचार घेत नाहीत. स्थिती जास्त बिघडल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. जे लोक जास्त वेळ बसून काम करतात ते अशा आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत त्वरित तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.

दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया

कोथरूड हॉस्पिटलमध्ये आधुनिक व नवीन वैद्यकिय तंत्रज्ञानाच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेची सुविधा मिळू लागली आहे. स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डेलायसीस, मणक्यातील इन्फेक्शन या सारखे मणक्याच्या आजारांना येथे दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाते. डॉ. लोखंडे यांच्या म्हणण्यानुसार दुर्बिणीची शस्त्रक्रिया गुंतागुुंतीची नाही, यात इन्फेक्शन व साईड इफेक्ट होत नाही, ऑपरेशनच्या वेळी रक्त देण्याची गरज पडत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुर्बिणीतून ऑपरेशन केल्यामुळे रुग्ण एका दिवसात घरी जाऊ शकतो.

Leave A Reply

Translate »