भाजपा वैद्यकीय आघाडी ( नॅचरोपॅथी विंग ) च्या वतीने ” संवाद भाजपाच्या मित्रांसोबत ” चा पुणे येथून भव्य शुभारंभ

महाराष्ट्रातील सरकारकडे योग व नॅचरोपॅथी कॉन्सिल करण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडी मागणी लावून धरणार – डॉ. अजित गोपछडे यांचे प्रतिपादन

पुणे:भारतीय जनता पार्टी , वैद्यकीय आघाडी ( नॅचरोपॅथी विंग ) च्या वतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुणे येथून संवाद भाजपाच्या मित्रांसोबत या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांच्या शुभहस्ते पार पडला . त्याचसोबत धन्यवाद मोदीजी अभियाना अंतर्गत उपस्थित लोकांना मार्गदर्शन करण्यात आले व नव मतदार नोंदणी , युवा वॉरीअर्स अभियाना प्रारंभ झाला . महत्वाचे म्हणजे या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी प्रामुख्याने युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती .
भाजपा वैद्यकीय आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे व सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व मुख्य उपस्थितीमध्ये ओरॅकल इन्स्टिट्यूट , पुणे येथे संपन्न या भव्य कार्यक्रमाला डॉ. उज्वला हाके ( सहसंयोजक , भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. धनंजय जोशी ( पुणे शहराध्यक्ष , भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. संदीप बुटाला ( पुणे शहर उपाध्यक्ष, भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. धर्मेंद्र शहा ( सल्लागार , पुणे शहर भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. सुनिल चव्हाण ( प्रदेश संयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) , डॉ. क्रांती कुमार महाजन ( प्रदेश सहसंयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) , डॉ. मिलिंद सरदार ( प्रदेश सहसंयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) यांची उपस्थिती लाभली . संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून भाजपा नॅचरोपॅथी विंग चे असंख्य जिल्हा संयोजक व सहसंयोजक यांसह विद्यार्थी , पदाधिकारी व नागरिक अशी सुमारे 250 लोकांची याप्रसंगी उपस्थिती लाभली .
अत्यंत महत्वाच्या अशा नवमतदार नोंदणी ( युवा वॉरीअर्स ) या अभियानाचा शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला . तसेच डॉ. सुनिल चव्हाण यांच्या “निसर्गोपचार – एक वरदान” व डॉ. क्रांती कुमार महाजन यांच्या “प्राकृतिक चिकित्सा – एक राष्ट्रभाव” या दोन पुस्तकांचे भव्य प्रकाशन करण्यात आले .
भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून राज्यातील निसर्गोपचारकांच्या हिताकरीता महाराष्ट्र राज्य सरकारची योग व निसर्गोपचार कॉन्सिल निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीत सर्वोतोपरी हालचाली करून लवकरच राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून कॉन्सिल निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध असेल , असे प्रतिपादन याप्रसंगी डॉ. अजित गोपछडे यांनी केले . तसेच धन्यवाद मोदीजी या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी व त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने धन्यवाद मोदीजी हे पोस्टकार्ड उत्स्फूर्तपणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना पाठवावे , असे आवाहन याप्रसंगी भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपाळे यांनी उपस्थितांना केले .
अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न या कार्यक्रमामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन करीत संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन डॉ. मिलिंद सरदार यांनी केले . संभाजीनगर जिल्ह्याचे भाजपा नॅचरोपॅथी विंगचे जिल्हा संयोजक डॉ. राजेंद्र पाटील यांनी याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांना भगवतगीताकृष्ण हे ग्रंथ भेट स्वरूप देवून आपला लक्षणीय सहभाग नोंदविला . अशाप्रकारे संपन्न या भव्य कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ओरॅकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण , भाजपा नैचरोपैथी विंग च्या प्रदेश सहसंयोजक डॉ. सुकन्या साळवे , ओरॅकल इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी , कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave A Reply

Translate »