Ankylosing Spondylitis Welfare society celebration rally of world Arthritism day

जनजागृती रॅलीने जागतिक संधिवात दिन साजरा ; अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस वेलफेअर सोसायटीचा उपक्रम

पुणे: जागतिक संधिवात दिनानिमित्ताने संधिवात आजाराबद्दल समाजात जनजागृती निर्माण होण्यासाठी अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस वेलफेअर सोसायटीच्या वतीने प्रत्येकवर्षी साजरा करतो आहोत.शिवाय या दिवशी संधिवाता बद्दल असणारी विविध जागृतीपर व्यख्यानेही आयोजित आणि प्रत्यक्ष बैठकीचेही आयोजन करणे हा त्यामागचा सामाजिक अशय असतो. यावेळी उपस्थित रुग्णांना समजेल अशा भाषेमध्ये माहिती दिली जाते. शिवाय संधिवाता पासून येणाऱ्या आजाराबद्दल जे अपंगत्व येते त्यावर इलाज केला जाऊ शकतो. अशी माहिती डॉ.प्रवीण पाटील यांनी पुणे येथील नीतू मांडके सभागृह टिळक रस्ता येथील आयोजित बैठकीत दिली.

अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीस वेलफेअर सोसायटी तर्फे जागतिक संधिवात दिनानिमित्त जनजागृती रॅली आयोजन आणि व्याख्यानाने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातून विविध भागातील रुग्ण सहभागी झाले होते. सदरील व्याख्यानमाला तीन सत्रांमध्ये पार पडली. यात विविध विषयांवरील तीन तज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.व्याख्याना दरम्यान असलेले रुग्णांमध्ये समज गैरसमज याबद्दल विस्तृत चर्चा झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

कार्यक्रमास, डॉ.मनीष दस्ताने, डॉ.प्रवीण पाटील, प्राची भोसले आदी मान्यवरांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराजा सूर्यनारायणाप्पा तसेच अमित पोळ यांनी केले.

Leave A Reply

Translate »