बॉक्सर चंद्रिका पुजारी ही पुण्याची नवी सुवर्णकन्या : मुरलीधर मोहोळ

चंद्रिकाच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतील मुलांना नवी प्रेरणा : राहुल डंबाळे

पुणे : बहरीन येथे सुरु असलेल्या आशियन युवा क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करून बॉक्सिंग क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळून देणारी चंद्रिका ही नवी सुवर्णकन्या आहे , तिच्या अतुलनीय कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.पुणे स्टेशन येथील ताडीवाला रोड झोपडपट्टीत राहणारी चंद्रिका पुजारी या 17 वर्षीय युवतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करून देशाला गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी तिचा व तिचे कोच जयंत शिंदे व क्लबचे संचालक सचिन शिंदे यांचा घरी जाऊन विशेष सत्कार केला. यावेळी पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील फोनवर संपर्क साधून चंद्रीकाचे विशेष अभिनंदन केले.“ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द व मेहनतीच्या जोरावर भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असून चंद्रिकाच्या रूपाने देशाला पुणेकरांची गोल्डन गर्ल अर्थात सुवर्णकन्या नव्याने मिळाल्याचे गौरवोद्गार देखील मोहोळ यांनी चंद्रिका व तिचे कोच तसेच कुटुंबीयांशी फोनवर बोलताना व्यक्त केली आहे. “ दरम्यान झोपडपट्टीतील युवकांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन हा चंद्रिकाच्या कामगिरीमुळे बदलला जाईल. संधी व आवश्यक ते पाठबळ मिळाल्यास आम्ही कशातही कमी नाही हे दाखवून देण्याचे काम चंद्रिकांने केले आहे. चंद्रिकाची कामगिरी ही निश्चितच अभिमानास्पद असून प्रत्येक गरीब कुटुंबातील आई-वडिलांना अभिमान वाटणारी आहे.दरम्यान चंद्रिकाला पुढिल ऑलिंपिक साठी शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी दिला. यावेळी प्रभू सुनगर , चंद्रिकाचे वडिल भोरेशी पुजारी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »