अत्यंत गाजलेला “चिमणगाणी” हा म्युझिक अल्बम नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला
चिमणगाणी” या नव्या म्युझिक अल्बमचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते
· बालपणीच्या रम्य आठवणीना उजाळा देण्यासाठी नवीन स्वरूपात हा अलब्म प्रेक्षकांच्या भेटीला
· या अल्बमला नामवंत संगीतकार कै आनंद मोडक यांनी संगीत दिले
ज्येष्ठ कवयित्री हेमा लेले आणि द बीट क्राफ्ट हेरीटेज यांच्या संयुक्त विद्यमाने “चिमणगाणी” या नव्या म्युझिक अल्बमचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या अल्बमच्या गीतकार हेमा लेले, निर्माते श्री योगेश लेले आहेत. याला संगीतबद्ध केले आहे प्रसिद्ध संगीतकार कै आनंद मोडक यांनी तर निर्मिती संयोजक अंजली मराठे आहेत.
यावेळी बोलताना ज्येष्ठ कवयित्री हेमा लेले म्हणाल्या की, १९९० मध्ये मी “चिमणगाणी” या अत्यंत गाजलेल्या बालकवितांच्या रंगमंचीय कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन केले होते. तसेच देश विदेशात गाजलेल्या या कार्यक्रमातील गाणी आजही ताजी आणि श्रवणीय वाटतात. फक्त लहानग्यांनाच नव्हे तर मोठ्यांनाही त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणीच्या प्रदेशात पुन्हा घेउन जातात. म्हणूनच आम्ही बालपणीच्या रम्य आठवणीना उजाळा देण्यासाठी नवीन स्वरूपात हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
यावेळी बोलताना चिमणगाणी” या म्युझिक अल्बमचे निर्माते आणि द बीट क्राफ्ट हेरीटेजचे श्री योगेश लेले म्हणाले की, आज काल आपण मुलांच्या वयाला साजेशी गाणी नाहीत अशी तक्रार ऐकतो. परंतु “चिमणगाणी” या नव्या म्युझिक अल्बममुळे ही तक्रार काही प्रमाणात कमी होईल अशी मला खात्री वाटते. या म्युझिक अल्बममुळे प्रेक्षकांना निरागस भावविश्वासाची संगीतमय सफर नक्कीच अनुभवता येईल, गुणगुणता येईल, गाता येईल.
यावेळी बोलताना अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण संगीता पासून लांब गेलो आहे. परंतु “चिमणगाणी” मधील गाणी अत्यंत सुरेख आणि श्रवणीय आहेत. बऱ्याच दिवसांपासून बालगीतांचा सुरेख अल्बम आलेला नाही त्यामुळे चिमणगाणी मधील गाणी लहानग्याच्या मनात घर करतील हे नक्की.”