स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती पुणे महापालिकेत कायम उजळत राहणार

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्मरण पुणे महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, या उद्देशाने सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेला स्व. अजितदादा पवार यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. हे तैलचित्र नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिकेच्या सभागृहात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याचा, राजकीय व सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, अशी भावना सभासदांनी व्यक्त केली.

गणेश बिडकर म्हणाले “स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेसाठी सतत झटणारे लोकनेते होते. पुणे शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे तैलचित्र महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, जेणेकरून भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, यासाठी ही आदरांजली अर्पण केली आहे.”

Comments are closed.

Translate »

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia