युवा मित्र फाऊंडेशनच्या वतीने स्री सन्मानाची स्री अस्मितेची’ महिला दहिहंडी उत्साहात

0

पुणे: पुण्यातील युवा मित्र फाऊंडेशनच्या वतीने समाजातील महिला सक्षमीकरणाची जाणिव ओळखत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला महिला दहिहंडी महोत्सव ताडीवाला रोड येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित रिदम जिमनॅस्टिक खेळाडू अक्षता शेटे, आमदार सुनील कांबळे,अन्नसुरक्षा मंडळाचे सदस्य योगेश केदार,
कृष्णा राजाराम अष्टेकर कंपनीचे विश्वंभर बेंद्रे,सुजित यादव,मयूर गायकवाड, उद्योजक अजिंक्य जाधव,गजानन चौधरी, दहीहंडी महोत्सवाचे आयोजक आनंद जाधव,तसेच युवा मित्र फाउंडेशनचे कार्यकर्ते संतोष चव्हाण,महेंद्र गायकवाड यादी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते स्थानिक महिलांना मोफत नेत्र तपासणीचे पास वाटप करण्यात आले तसेच बॉक्सर अकॅडमीचे महिला खेळाडूंचा सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील नामवंत “शिवतेज महिला दहिहंडी पथक दहिहंडीला सलामी देत दहिहंडी फोडण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »