Photostat App Launch for Photography Sector

Book a photographer with one click

फोटोग्राफी क्षेत्रासाठी ‘फोटोस्टॅट ॲप’ लाँच फोटोग्राफर बुक करा एका क्लिकवर..

पुणे: आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांना प्रत्येक सेवा तत्काळ हवी असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यामध्ये फोटोग्राफी क्षेत्रासाठी ‘फोटोस्टॅट ॲप’ लाँच करण्यात आले. या ॲपमुळे राज्यातील अनेक फोटोग्राफर्स एकमेकांशी जोडले जातील. तसेच ग्राहकांना घरबसल्या या ॲपमधून फोटोग्राफर बुक करता येणार आहे. बूकिंग केल्यानंतर अगदी १५-२० मिनीटांमध्ये  फोटोग्राफर निश्चित ठिकाणी पोहोचेल. विशेषतः फोटो काढल्याबरोबरच तिथेच ग्राहकांना लगेचच फोटोची प्रतही देण्यात येणार असल्याची माहिती फोटोस्टॅटचे सचिन अवसरमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुप्रसिद्ध फोटोग्राफर योगेंद्र चव्हाण, सचिन भोर, प्रियदर्शनी भोर, रंजन झिंगाडे, जयनंदनी मुथू उपस्थित होत्या.
फोटोस्टॅट ॲपमध्ये कस्टमर कॅटगरीमधून फोटोशूट कोणत्या प्रकारचा आहे ते ग्राहक निवडू शकतात. उदा. पासपोर्ट साइज़, शॉर्ट टाईम फोटोशूट, हाफ डे फोटोशूट, फुल डे फोटोशूट या व्यतिरिक्त प्री वेडिंग शूट,  वेडिंग शूट, मॉडेल फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, इंव्हेंट फोटोग्राफी, कर्शियल फोटोग्राफी, पेट,  फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी, मॅटरनिटी फोटोग्राफी इ. अनेक प्रकारच्या सोयी या ॲपद्वारे ग्राहकांना घेता येतील. हे ॲप फोटोग्राफर्सना चांगली संधी आहे. ईच्छुक फोटोग्राफर्सना फोटोस्ट्याट सोबत काम करायचे असेल तर त्यांनी रितसर नोंदणी करणे आवश्यक आहे. 
सचिन अवसरमल म्हणाले की, “फोटोग्राफर्सने आमच्याकडे नोंदणी करताच ते आमच्याशी जोडले जातील. या अ‍ॅपच्या आधारे फोटोग्राफर्स ऑनलाइन ऑर्डर घेवू शकतील. फोटोग्राफर ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणच्या १० किमी परिसरातील ऑर्डर त्यांना स्वीकारता येतील. ज्यावेळी फोटोग्राफरना काम करायची ईच्छा नसेल त्यावेळी तेंव्हा ते त्यांचे प्रोफाईल ऑफलाईन मोड वरती टाकू शकतो. इतकं सहज हे ॲप फोटोग्राफर व ग्राहक यांना वापरता येण्यासारखं आहे.

Leave A Reply

Translate »