Smita Sonawane founder of ‘The Shahu’ hotel located at Kumthekar Road

Pune (P&V news service): “There’s something so special about a woman who dominates in a man’s world. It takes a certain grace, strength, intelligence, fearlessness. India is home to various talented women who have glorified themselves showcasing their entrepreneurship skills and building huge business brands.

Smita Sonawane came to Pune from Nashik for a job in a bank, but she gets bored of mess food. She starts cooking on its own at room. The taste of her hands is appreciated by her friends and this is where she gets to know the taste of her hands.

Mouth watering Kaala masala Mutton thali. Home made Masala.


The specialty of this hotel is the gravy and the Gavaran masala used for it. Delicious meals and low rates, due to which ‘The Shahu’ is gaining popularity among the students of Pune who come from rural areas to prepare for the competitive exams. Smita Sonawane, the owner of this hotel originally from Nashik, is highly educated. She built this hotel with great courage and without the support of anyone.


The aroma of the spices will send your taste buds in a flurry. Though a restaurant their motto strictly is serving great food. This place has some lip smacking, spicy thalis which comprises one special chicken/mutton, special fish, kheema/egg curry; chapati/bhakri; rice; rassa with generous amounts of onion and Sol Kadhi. This place is actually a haven for meat lovers. From their chicken fry thali, to their kaala mutton thali & mutton sukka, each one of these dishes is sure to leave you craving for more. The Solkadhi is freshly prepared for the guests, which lends it its characteristic taste & also veg food serve.


Although goat meat is a specialty, chicken, kolhapuri, tandoor, Chinese and veg dishes are also available here recognizing the needs of the customers. There is a different chef for that. Smita Sonawane manages the kitchen of goat meat, Gavaran gravy and Aalani soup. The hotel opens on Sundays from 12 noon to 4 pm and from 7 pm to 19 pm.


Sonawane says, I came to Pune for a bank job. However, she was not interested in the sales department. So she quit her job. Mess, meanwhile, didn’t feel like eating. So sometimes nonveg meals were made in the room. colleague come to eat. They began to appreciate the taste. Most of the villagers eat goat meat. Bolai mutton is available here in Pune. They don’t eat these students. I also don’t found goat meat in most places here. The gravy is also available in Satari, Kolhapur. Therefore, with a special focus on goat meat, Gavaran gravy and home-made weed soup, we started a restaurant in July 2018 at Hatti Ganpati Chowk in Sadashiv Peth.

Shortly afterwards, seeing the growing response of eateries, ‘The Shahu’ on Kumthekar Road near alka Talkies. Meanwhile came the crisis of the corona. Mess, hotels closed. So I turned on the mess. The students in the rural areas were having a hard time for food. They started delivering the boxes home. Therefore, these students were associated with ‘The Shahu’, said Sonawane.
But the number of customers increased. So there was a need for more spices. Therefore, he is making masala from the village, said Sonawane.

She said about the experience of the Corona period, it was a big blow during this period. The hotel had just opened. That’s when the Corona crisis came. Reduced workers. SHe started giving home delivery boxes to the students again. So at least the hotel rent would go up. Because I believed in the quality of my food. Now the hotel is back in full swing. Making delicious meals is one of my favorite activities. It gives me great pleasure. I can even cook for 150 people at a time. Sonawane finally said with great confidence that I chose my favorite career and succeeded.

तरुणीने हातच्या चविलाच करिअर बनवून उभारलं ‘ द शाहू ‘

बोकडाचे मटण , गावरान रस्सा आणि आळणी सूप ठरतेय खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र पुणे , ता . २५ : बँकेतील नोकरीनिमित्त नाशिकहून पुण्याला आलेली एक तरुणी मेसच्या जेवणाला कंटाळते . रूमवर स्वतः च स्वयंपाक बनवू लागते . तिच्या हातच्या चवींचे मित्र – मैत्रीणींकडून कौतुक होऊ लागते आणि इथेच तिला तिच्या हातची चव कळते . त्यातूनच तिला जगण्याचे ध्येय मिळते …. आणि पुढे अनेक संकटांवर मात करत कुमठेकर रस्त्यावर दिमाखात उभं राहतं ‘ द शाहू ‘ हे स्पेशल बोकडाचे मटण , अस्सल गावरान रस्सा आणि घरगुती आळणी सुपची चव देणारं हॉटेल .. घरगुती चवीचे बोकडाचे मटण , आळणी सूप , गावरान रस्सा आणि त्यासाठी वापरला जाणारा गावरान मसाला , ही या हॉटेलची खास वैशिष्ट्ये .

चविष्ट जेवण आणि कमी दर , यामुळे ‘ द शाहू ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पुणेकर खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे . मूळच्या नाशिकच्या असलेल्या या हॉटेलच्या मालक स्मिता सोनवणे उच्चशिक्षित आहेत . त्यांनी मोठ्या हिमतीने एकटीने कोणाचेही पाठबळ नसताना हे हॉटेल उभे केले . त्यातून आज पुण्यात या हॉटेलची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . बोकडाचे मटण ही स्पेशालिटी असली , तरी ग्राहकांची गरज ओळखून चिकन , कोल्हापुरी , तंदूर , चायनीज आणि व्हेज खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी मिळतात . त्यासाठी वेगळा आचारी आहे . बोकडाचे मटण , गावरान रस्सा आणि आळणी सूप चे किचन मात्र स्वतः स्मिता सोनवणे सांभाळतात .

हॉटेल दुपारी १२ ते ४ आणि रात्री ७ ते १ ९ या वेळेत रविवारसह सुरू असते . या प्रवासाबद्दल सांगताना सोनवणे म्हणतात , मी बँकेच्या नोकरीनिमित्त पुण्यात आले . मात्र सेल्स विभागातील ते काम रुचले नाही . स्वाभिमान दुखावला जाऊ लागला . म्हणून ती नोकरी सोडली . दरम्यान मेसचे जेवण खाऊ वाटत नव्हते . म्हणून रुमवरच कधी कधी नॉनव्हेज जेवण बनवू लागले . मित्र – मैत्रिणी जेवायला यायच्या . त्यांच्याकडून चवीचे कौतुक होऊ लागले .

गावाकडे सर्वाधिक बोकडाचे मटण खातात . इथे पुण्यात बोलाईचे मटण मिळते . ते हे विद्यार्थी खात नाहीत . मलाही इथे बहुतांश ठिकाणी बोकडाचे मटण मिळायचे नाही . रस्सा देखील सातारी , कोल्हापुरीच मिळतो . म्हणून बोकडाचे मटण , गावरान रस्सा आणि घरच्या प्रमाणे आळणी सूप यावर विशेष लक्ष देऊन सदाशिव पेठेतील हत्ती गणपती चौकात जुलै २०१८ मध्ये खानावळ सुरू केली .

त्यानंतर काही काळाने खवय्यांचा वाढता प्रतिसाद बघून अलका टॉकीजजवळ कुमठेकर रस्त्यावर ‘ द शाहू ‘ हे हॉटेल सुरू केले . दरम्यान कोरोनाचे संकट आले . मेस , हॉटेल्स बंद झाली . विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होऊ लागले . त्यामुळे मी मेस चालू केली . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जेवणाचे खूप हाल होत होते . त्यांना डब्बे घरपोच देऊ लागले . त्यामुळे हे विध्यार्थी ‘ द शाहू’शी जोडले गेले , असेही सोनवणे म्हणाल्या , सुरवातीला घरून ( सटाणा , जि . नाशिक ) मसाला बनवून आणायचे . मात्र ग्राहकांची संख्या वाढली . त्यामुळे अधिक मसाल्याची गरज भासू लागली . त्यामुळे गावाकडील महिलांकडून मसाला बनवून घेत आहे , असेही सोनवणे यांनी सांगितले .

कोरोना काळातील अनुभवाबद्दल सोनवणे म्हणाल्या , या काळात मोठा फटका बसला . नुकतेच हॉटेल सुरू केले होते . तोच कोरोनाचे संकट आले . कामगार कमी केले . पुन्हा विद्यार्थांना घरपोच डब्बे देण्यास सुरुवात केली . त्यामुळे किमान हॉटेलचे भाडे निघायचे . हार मानली नाही . कारण माझा माझ्या जेवणाच्या दर्जावर विश्वास होता . आता पुन्हा हॉटेल नव्या जोमाने सुरू आहे . चविष्ट , रुचकर जेवण बनविणे हे माझ्या सर्वांत आवडीचे काम आहे . यात मला मोठा आनंद मिळतो . एकावेळी अगदी १५० लोकांचा स्वयंपाक देखील मी बनवू शकते . माझ्या आवडीलाच मी करिअर म्हणून निवडले आणि यशस्वी झाले , असे शेवटी मोठ्या आत्मविश्वासाने सोनवणे यांनी सांगितले .

Leave A Reply

Translate »