व्यावसायिक चालकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पुणे: वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत सुरू राहणार आहे.

या विशेष उपक्रमांतर्गत सर्व व्यावसायिक वाहनचालकांसाठी (ऑटो, ट्रक, कॅब चालक) मोफत डोळे तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी चालकांकडे वैध ड्रायव्हिंग परवाना असणे बंधनकारक आहे.
रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने स्पष्ट दृष्टी आवश्यक असून, रात्री वाहन चालवताना किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात दृष्टी कमी पडल्यामुळे अनेक अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर चालकांना त्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्यास प्रोत्साहित करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. दृष्टिदोषामुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यावसायिक वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे या उद्देशाने एएसजी आय हॉस्पिटलचा हा उपक्रम सध्या वाहनचालकांकडून उत्साहाने प्रतिसाद मिळवत आहे.

Comments are closed.

Translate »