भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २४ सर्वपक्षीय पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. आज देखिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख व उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह इतर सर्व उमेदवार आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे मनसेला प्रभागात मोठा धक्का बसला असून, भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये विभाग अध्यक्ष विशाल पवार यांच्यासह मनोज गुप्ता, यश मोर, तन्मय पवार, ऋषी सोलंकी, अथर्व टेंबे, साई राऊत, अथर्व उर्फ सोन्या वाघमारे, ऋषी सुकलेजा, राज मोरे, भगवान शिंदे, मंदार पाचोरे, मंदार माळवदकर, ओमकार भोसले यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पदाधिकारी प्रभागात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय होते. त्यांच्या या प्रवेशाने मनसेच्या प्रभागातील पायाभूत संरचनेला खिंडार पडले असून, गणेश बिडकर यांच्या विजयाला अधिक बळ मिळाले आहे.
गणेश बिडकर यांनी प्रभाग २४ मध्ये केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपकडे ओढा वाढला आहे.

Comments are closed.