‘शब्द नाही, काम बोलणार’, सूस गावात लहू बालवडकरांना जनतेचा ठाम पाठिंबा

पुणे। सुस गाव: सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहू बालवडकर विजयाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. आज भाजपाच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली भव्य पदयात्रा म्हणजेच सूस गावातील नागरिकांनी दिलेला विजयाचा कौल ठरला आहे.

भगवती नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा भैरवनाथ मंदिर येथे समाप्त झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण, औक्षण आणि घोषणाबाजी करत भाजपचे जोरदार स्वागत केले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ औपचारिक नव्हता, तर सूस गावाच्या विकासासाठी भाजपच योग्य पर्याय असल्याचा ठाम राजकीय संदेश देणारा होता.

 

सूस गावातील प्रत्येक घरातून मिळालेला पाठिंबा, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास यामुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाला आहे. जनतेने दाखवलेला हा विश्वास सूस गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत आधार ठरत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका भाजपने पुन्हा एकदा अधोरेखित केली. मतदारांनी दिलेले प्रत्येक मत हे सूस गाव आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक ०९ च्या प्रगतीचा पाया ठरणार असून, विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

 

भाजपने पुढील पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा जनतेसमोर मांडला असून, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक व्यवस्थेचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. विकास कागदावर न राहता तो थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसेल, असा ठाम दावा लहू बालवाडकर यांनी केला आहे.

 

यावेळी भाजप नेते लहू बालवाडकर यांनी नागरिकांना संबोधित करत सांगितले की, मला तुम्ही मत देऊन सेवा करण्याची एक संधी द्या; पुढील ५ वर्ष हि तुमच्या आमच्या प्रभागाच्या विकासाची असतील. शब्दांपेक्षा कामातूनच भाजप आपली विश्वासार्हता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आजच्या या भव्य पदयात्रेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, प्रभागात भाजपला जनतेचा ठाम पाठिंबा मिळत असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये विजयाचा कल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.

Comments are closed.

Translate »