सीसीटीव्हींच्या जाळ्याने प्रभाग २४ सुरक्षित; गणेश बिडकरांची दूरदृष्टीची झलक

पुणे : प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांच्या दूरदृष्टी व भविष्यकालीन व्हिजनमुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठ परिसरात महापालिकेच्या निधीतून १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक बसला असून प्रभागाची एकूण सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्रभागाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे कौतुक होत आहे.

बिडकर यांच्या माध्यमातून कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभागा मधील मध्यवर्ती भागात येणारे २४ मुख्य चौक, ६० मोक्याच्या ठिकाणे, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम आणि बस थांबे अशा गर्दीच्या भागांची काळजीपूर्वक निवड करून हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

 

यामुळे समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के भाग आता या कॅमेऱ्यांच्या निगरानीखाली आला आहे. यामुळे पोलिसांना गर्दीवर सतत लक्ष ठेवणे सोपे झाले असून पोलिस यंत्रणेवरील ताण लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

 

पेठांचा हा परिसर पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर सामाजिक कार्यक्रमांच्या काळात प्रचंड गजबजलेला असतो. अशा वेळी या प्रगत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नागरिकांची सुरक्षा वाढली आहे आणि गुन्हेगारांवर मजबूत वचक निर्माण झाला आहे.

 

याबाबत बोलताना बिडकर म्हणाले, भविष्यात प्रभागाच्या सुरक्षेसाठी आणखी प्रगत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करून प्रभागातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणा हा माझा प्रमुख उद्देश असणार आहे. प्रभागातील नागरिकांना दहशतमुक्त राहता यावं यासाठी कायदा आणि सुव्यवस्था सुधारणा हा माझा मुख्य उद्देश असून त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता भविष्यात देखील माझ्याकडून करण्यात येईल असा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.

Translate »