तिमिरातून शिव तेजाकडे नेणारा अष्ट सहस्त्र दीपोत्सवदिवाळी पाडव्याला शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाला सलग १४ व्या वर्षे ८ हजार पणत्यांची मानवंदना ; शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम

0

पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर… आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे सलग १४ व्या वर्षी “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा” साजरा झाला.

श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, समितीच्या महिला सदस्या रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, विजया सागर पवार, प्रिया निलेश जेधे, दिपा किरण कंक, पूनम रोहित घोरपडे, प्रियांका मोहन पासलकर, सौ दिपाली विशाल गव्हाणे, जोत्स्ना निलेश जगताप यांसह उपस्थित महिलांच्या हस्ते तसेच समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, समीर जाधवराव, निलेश जेधे, मंगेश शिळीमकर, प्रदीप मरळ, किरण शितोळे, ईशान अमित गायकवाड तसेच शिवकालीन स्वराज्यघराण्यांच्या वंशजांच्या व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानिपत वीर महादजी माळवदकर, पानिपत वीर महादजी व दादजी हरपळे, दक्षिण दिग्विजय वीर मानाजी मोरे ह्या स्वराज्यघराण्यांचा प्रविण पाटील यांच्या हस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे, शुरवीर सावंत स्वराज्य घराणे या स्वराज्य घराण्यांचा दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

प्रवीण पाटील म्हणाले शिवजयंती महोत्सव समितीचे अभिनव उपक्रम हे पुण्याचे नव्हेतर महाराष्ट्राचे वैभव आहेत. अतिशय शिस्तबध्द असणारे हे सोहळे देशामध्ये आदर्श निर्माण करत आहेत. अमली पदार्थ विरोधी मोहिमेत समिती अतिशय महत्वाची भूमिका निभावेल.

अमित गायकवाड म्हणाले, सलग १४ व्या वर्षी दीपोत्सव साजरा कराताना लक्ष लक्ष हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेत समितीची सर्व स्वराज्यघराणी एकदिलाने पोलीस प्रशासना बरोबर काम करणार आहेत. शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.

दीपोत्सवाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, समीर जाधवराव, निलेश गोरे, शंकर कडू, किरण शितोळे, मोहन पासलकर, निलेश जगताप, विशाल गव्हाणे, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »