सुवर्णवस्त्रानी सजले सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे रुपश्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे ; लक्ष्मीपूजनाला देवीला १६ किलो सोन्याची साडी

0

पुणे : लक्ष्मीपूजनानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. तसेच मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा, निलेश लद््दड, राजेश सांकला, मुरली चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मीपूजनाला देवीला नेसविण्यात आलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व आरास करण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

CAPTCHA


Translate »