पुणेकरांना आता घरातच फुलवीता येणार स्वच्छ आणि निरोगी परिसर
पुणे : मागील काही वर्षात सतत होणारी वृक्षतोड, वाहनांची वाढती संख्या तसेच वाढते इन्फ्रास्ट्रक्चर मूळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण वाढ झाली आहे. यावर तोडगा म्हणून पुणेकरांना आता घरातच स्वच्छ आणि निरोगी वातावरण कायम ठेवत बाग फुलविता येणार आहे.. याच पार्श्वभूमीवर भारतातील हाऊसप्लांट्स आणि शहरी बागायती मध्ये अग्रगण्य असलेल्या उगाओ ने पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आपले नविन दलान सुरू केले आहे. या माध्यमातून पुणेकरांना आता वायुप्रदूषणावर मात करून आपले अयोग्य अबाधित राखता येणार आहे.

ऊगाव ने भारतातील घर आणि बाग बाजारपेठ पुनर्निर्मितीच्या मिशनला पुढे नेण्याची वाट निर्माण केली आहे, जे वनस्पती पालनाच्या माध्यमातून निसर्गाशी एक गहन संबंध प्रस्थापित करण्यावर आधारित आहे.५ हजार फूट फूट क्षेत्रात या ठिकाणी १ हजार ५००
पेक्षा जास्त विचारपूर्वक निवडलेल्या फुलझाड व त्यांच्याशी संबंधित वस्तू आहेत. हवा शुद्धीकरण करणाऱ्या अनेक वनस्पती पाहायला मिळतात. त्यात पिस लीली प्लांट, बांबू पाम प्लांट, स्नेक प्लांट, अरिका, झेड झेड,, रबर प्लांट, मनी प्लांट अशा अनेक वनस्पती या ठिकाणी आहेत ज्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करतात, त्यामुळे ही झाडे घरात आवर्जून असावी जेणेकरून कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुदृढ राहावे अशी संकल्पना उगाओ च्या माध्यमातून मांडली घेली आहे. सोबतच बागायती साधने ते बागेतील गृह सजावतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंचा येथे समावेश करण्यात आला आहे. या घरातील या सजावटी साठी लागणाऱ्या वनस्पती चिरकाल टिकाव्यात त्यासाठी संदर्भात येथे कार्यशाळाही आयोजित केली जाते.
याबाबत बोलताना, उगाओचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धांत भलिंगे म्हणाले की, “पुण्यातील आमचे नावे दालन म्हणजे आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण हे देशातील आमचे १० वे स्टोअर आहे. एकसमान विचारांच्या व्यक्तींच्या समुदायामध्ये निसर्गाशी गहन संबंध प्रस्थापित करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. उगाओ येथे आम्ही सतत आमच्या निसर्गप्रेमी समुदायाची काळजी घेतो, त्यांना सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या वनस्पती, बागायती साधने आणि आवश्यक सामग्री देत असतो. त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शन आणि देखभाल सेवा प्रदान करतो.उगाओने हाऊसप्लांट्स आणि शहरी बागायती क्षेत्रात भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह नाव म्हणून आपली स्थिती बळकट केली आहे, ज्यामुळे हरित आणि अधिक संबंधित भविष्यासाठी एक मार्ग प्रशस्त झाला आहे.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.