पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या 600 ग्रॅम वजनाच्या 26 आठवड्यांच्या बाळावर यशस्वी उपचार

70 दिवसांच्या यशस्वी संघर्षानंतर बाळाला वाचविण्यात यश

पुणे – अंकुरा हॉस्पिटल, पुणे येथील डॉ. उमेश वैद्य यांच्या नेतृत्वाखालील आणि डॉ. सिद्धार्थ मदभुशी, डॉ. अनुषा राव यांचा समावेश असलेल्या टीमने 600 ग्राम वजनाची, 26 आठवड्यांची बाळाची यशस्वीपणे प्रसूती केली. रेस्पीरेट्री सिंड्रोम, प्रीमॅच्युर असल्याने अशक्तपणा, ऑस्टियोपेनिया, य रेटिनोपॅथी आणि कावीळ यासारख्या विविध गुंतागुंताींसह जवळजवळ 70 दिवसांच्या नवजात अतिदक्षता विभागातील (NICU) यशस्वी संघर्षानंतर आता हे बाळ सुखरुप घरी परतले आहे. अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टिमने या बाळाला नवे आयुष्य मिळवून दिले.

32 वर्षीय सुजाता नायर (नाव बदलले आहे)* तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत असताना तिचे मन आनंदाने भरून गेले होते. 15 जुलै रोजी अकाली प्रसूती कळा आल्याने तिला प्रसूतीसाठी पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉ. उमेश वैद्य (ग्रुप डायरेक्टर आणि नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख) सांगतात की, आईची प्रकृती स्थिर होती पण तिला मुदतपूर्व प्रसूती कळा आल्याने 15 जुलै रोजी योनीमार्गे प्रसूती करण्यात आली आणि तिने 600 ग्राम वजनाच्या 26 आठवड्याच्या बाळाला जन्म दिला. मायक्रो-प्रीमी म्हणजेच 26 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्मलेले बाळ आणि ज्याचे वजन हे 750 ग्रॅम पेक्षा कमी असते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सुविधा आणि कौशल्यामुळे अकाली जन्मलेल्या बाळांचे जगण्याचे प्रमाण वाढले आहे.

डॉक्टर अनुषा राव, नवजात शिशु आणि बालरोगतज्ज्ञ सांगतात की, बाळाचे फुफ्फुस विकसित झालेली नव्हती होती, तसेच बाळाचे इतर अवयवही पूर्णतः विकसित झालेले नव्हते. बाळाला एक महिना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले. या बाळाला आरोग्यविषयक इतरही गुंतागुंत होते जसे की अशक्तपणा, प्रीमॅच्युरिटीचा ऑस्टियोपेनिया (कमकुवत आणि ठिसूळ हाडे),स्तनपानाचा स्विकार न करणे आणि रेटिनोपॅथी. बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते आणि जन्मानंतरच्या 2 आठवड्यांनंतर कांगारूंची केअर उपचार करण्यात आले. बाळाला 5 दिवस व्हेंटिलेटरी सपोर्टवर ठेवण्यात आले आणि एक महिना नाकाला CPAP मशीन लावले होते. 34 आठवड्यांपासून बाळाला तोंडावाटे आहारास सुरुवात केली. 70 दिवसांच्या NICU उपचारानंतर बाळाला घरी सोडण्यात आले. आता बाळाचे वजन 1.5 इतके आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या बाळाच्या श्रवण चाचण्या, अल्ट्रासोनोग्राफी आणि रक्त चाचण्या सामान्य होत्या. बाळाची वाढ चांगली होत असून आता ती तिच्या वयानुसार विकासाचे टप्पे गाठत आहेत.

डॉ. सिद्धार्थ मदभूषी ( नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ) सांगतात की, आयट्रोजेनिक इन्फेक्शन/सेप्सिस टाळण्यासाठी, बाळाची चांगली काळजी घेणे हे बाळाची वाढ आणि विकासाचे टप्पे गाठण्यात महत्त्वाचे ठरते. हे भविष्यातील मेंदूची सामान्य वाढीस आवश्यक आहे. अंकुरा हॉस्पिटल हे प्रगत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बाळाच्या वाढीचा आणि वजनाचा मागोवा घेण्यासाठी नियमित तपासणी आणि फॉलोअपची आवश्यकता असतेः

आमच्या बाळाने जगण्यासाठी केलेला संघर्ष खरोखरच कौतुकास्पद आहे. अवघ्या 26 आठवड्यात जन्मलेल्या, बाळाने प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड दिले आणि आयुष्याची लढाई खऱ्या अर्थाने जिंकली असे म्हणण्यास हरकत नाही. अंकुरा हॉस्पिटल मधील तज्ञांच्या कुशल टीमने प्रसंगावधान राखत योग्य उपचार केल्याने त्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहु अशी प्रतिक्रिया बाळाची आई सुजाता नायर (नाव बदलले आहे)* यांनी व्यक्त होईल.

Leave A Reply

Translate »