अंथरुणाला खिळलेला रुग्ण अखेर स्वतःच्या पायांवर राहिला उभा – डॉ. आशिष अरबट

प्रख्यात रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉ. आशिष अरबट यांनी केले यशस्वी उपचार सुपरपाथ टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया तंत्राचा वापर

पुणे – कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये एव्हॅस्कुलर नेक्रोसिसची समस्या दिसून येते. पुण्यातील सुप्रसिध्द रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉ. आशिष अरबट (ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स (ONP हॉस्पिटल्स) येथे ४३ वर्षीय लाला धुमाळ यांच्यावर सुपरपाथ किंवा सुप्राकॅप्सुलर पर्क्यूटेनिअसली असिस्टेड टोटल हिप रिप्लेसमेंट हे अत्याधुनिक तंत्र हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेस फायदेशीर ठरत आहे.

पुण्यातील श्री लाला धुमाळ(४३वर्षे) यांना कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतर दोन वर्षे असह्य सांधेदुखीचा सामना करावा लागत होता. त्याच्या नितंबांमध्ये प्रचंड वेदना व अस्वस्थता जाणवत होती आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखी खालावू लागली. कालांतराने अवस्था इतकी वाईट झाली की ते पूर्णतः अंथरुणाला खिळून होते. काही ठराविक चाचण्यांनंतर रुग्णाला ॲव्हस्क्युलर नेक्रोसिस (AVN) चे निदान झाले ही एक अशी परिस्थिती आहे जिथे हाडांना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हाडांमधील ऊती मृत पावतात. या निदानाचा संबंध कोविड नंतरच्या गुंतागुंतांशी जोडला गेला असून, ही जगभरातील वाढती चिंतेची बाब ठरली आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्यांपैकी 3 ते 4 टक्के व्यक्तींमध्ये एव्हीएनची समस्या आढळून आली. स्टिरॉइड पध्दतीने उपचार आणि पोस्ट-व्हायरल इन्फ्लेमेशन यास कारणीभूत ठरते.

रुग्णास सुपरपाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. सुपरपाथ (SUPERPATH) तंत्र स्नायूंच्या ऊतींना नष्ट न करता टोटल हिप रिप्लेसमेंटसाठी एक मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेचा पर्याय ठरतो. ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल्स (ONP हॉस्पिटल्स) पुणे येथे झालेल्या या शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सुपरपाथ तंत्राचा वापर केल्याने केवळ शस्त्रक्रियेची अचूकता वाढते असे नाही तर शस्त्रक्रिये दरम्यान रक्तस्राव कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. या प्रक्रियेबद्दल बोलताना, डॉ. आशिष अरबट(जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन) सांगतात की,  रुग्णाची स्थिती ही कोविड नंतर दिसून येणारी गंभीर गुंतागुंत  होती जी दिवसेंदिवस वाढत चालली होती. सुपरपाथ तंत्र शस्त्रक्रियेने आम्हाला रुग्णावर अचुक व यशस्वी उपचार करता आले.

शस्त्रक्रियेनंतर श्री लाला धुमाळ यांना काही दिवसांसाठी रिहॅबिलेशनचा सल्ला देण्यात आला. फिजिओथेरपीमुळे ते लवकरच आपली चालण्यास सक्षम झाले आणि आता तो कोणत्याही आधाराशिवाय चालत आहे. या संपुर्ण प्रवासाबद्दल बोलताना रुग्णाने तज्ज्ञांचे आभार मानले व मी पुन्हा चालू शकेन याची कल्पनाही केली नव्हती. डॉ. अरबट आणि त्यांच्या टीमने मला वेदनामुक्त जीवनाची ही नवी संधी दिली आहे.

जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉ. आशिष अरबत यांनी कोविड नंतरच्या रूग्णांमध्ये एव्हीएनच्या वाढत्या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे,त्यांच्या आजारपणात उच्च डोस असलेल्या स्टिरॉइड्सचा समावेश असल्याने त्यांच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम झाले. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की महामारीपासून जागतिक स्तरावर एव्हीएन प्रकरणांमध्ये 15-20% वाढ झाली आहे.

डॉ. अरबट यांनी कोविड नंतरच्या गुंतागुंतांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर जोर देत आणि सतत सांधेदुखीचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला असा मोलाचा सल्ला दिला. एव्हीएनच्या प्रकरणांमध्ये वेळीच करणे आवश्यक आहे. लवकर निदान आणि उपचार केल्याने रुग्ण वेदनारहित आयुष्य जगू शकतो.

Leave A Reply

Translate »