गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ, पांडव नगर  तर्फे मनपा सेवक वसाहत, पीएमसी कॉलनीच्या प्रश्नाबाबत  बाबत  व्यंगचित्रातून समस्या यावर पुणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यंगचित्राचा देखावा

0

पुणे -गणेशोत्सवानिमित्त अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ तर्फे मनपा सेवक वसाहत, पीएमसी कॉलनीच्या प्रश्नाबाबत  बाबत  व्यंगचित्रातून समस्या यावर पुणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  व्यंगचित्राचा देखावा  तयार करण्यात आला आहे. या देखाव्याची संकल्पना अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास पवार यांची असून बऱ्याच दिवसापासून पीएमसी कॉलनीतील  इमारती जुन्या झाल्या आहेत. त्या घरांमधून  पाण्याचे सारखे लिकेज होत असून कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील पीएमसी कॉलनीतील मनपा कर्मचारी जीव मुठीत  धरून राहत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते अशी प्रतिक्रिया तेथील रहिवासी नागरिक सांगत आहेत. इमारतीला साठ वर्षापेक्षा जास्त दिवस झाले आहेत त्यामुळे ती मोडकळीस आली आहे या इमारतीतील चाळीत 168 घरे असून 1000 कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. साधारणता 8 ते 10 जण एका घरात राहत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यावर त्वरित दखल घेऊन या पीएमसी कॉलनीतील सेवकांना चांगली घरे देण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.कैलास पवार यावेळी म्हणाले की, “आम्ही वारंवार पालिका आमदार नगरसेवक यांना समस्या सांगत आहोत पण प्रत्येक वेळी एकच उत्तर येते बजेट नाही ..जर आम्ही दरमहा भाडे भरतो मग मेंटेंनन्स  का होतं नाही ? आता तर ईमारती धोकादायक झालेल्या आहेत  स्ट्रक्चरल रिपोर्ट पाच वर्षांपूर्वीच आलेला आहे” या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी हा या व्यंगचित्राच्या देखाव्याचा उद्देश आहे. अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ ट्रस्ट पांडवनगर पुणे तर्फे याबाबत अनेक आंदोलने व पाठपुरावा करण्यात आला आहे तरी अजून कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. या गणेशोत्सव निमित्त  अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ ट्रस्ट पांडवनगर पुणे तर्फे श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी अखिल पीएमसी कॉलनी मित्र मंडळ ट्रस्ट पांडव नगर पुणे चे अध्यक्ष कैलास पवार कार्याध्यक्ष विशाल साळुंखे उपाध्यक्ष सचिन अवघडे व्यवस्थापक राज साळवी महेश काळे ऋतिक थोरात सुमित थोरात साजन मोहिते योगेश कदम श्रीकांत साठे आदी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या व्यंगचित्रांच्या देखाव्याची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष कैलास पवार यांची असून त्याचे रेखाटन पुण्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार  धनराज गरड यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »