गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली

पुणे : सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाड मधील शेल, भोगाव येथे नैसर्गिक जलस्त्रोत्र या प्रकल्पातून गावातील 49 कुटुंबाची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे. डोंगरावरील नैसर्गिक स्रोतांचे पाणी साठवून ते विजेचा वापर न करता गावकऱ्यांना पाईपलाईन द्वारे पाण्याच्या टाकीत पुरवठा करून गावकरयांची तहान त्यांनी भागवली आहे.

एकीकडे भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना दुसरिकडे महाडच्या शेल, भोगाव या गावातील महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर पायपीट वर्षानुवर्षे करत असत. पावसाळ्यात पाणी आणण्यासाठी त्यांची शक्ती आनि वेळ खर्च व्हायचा. त्यांची ही पायपीट रोखण्यासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या वतीने त्याची पाहणी करण्यात आली आणि एक प्रकल्प तयार करण्यात आला. तसेच त्यामुळे या गावातील 72 एकर जमीनही पाणलोट क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आली आहे.

यामध्ये, जवळील डोंगरावर जेथे झरयांद्वारे नैसर्गिक पाणी वाहते तेथे एक नैसर्गिक बांध घातला. तसेच तेथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आणि ते पाणी त्या टाकीमध्ये साठवले. त्यानंतर, ते पाणी पाईपलाईनद्वारे गावच्याजवळ टाकी बांधून त्यामध्ये साठवण्यात आले आणि तेथून ते पाणी आता गावकऱ्यांना पुरवले जात आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात या झऱ्याची संततधार सुरूच असते त्यामुळे कोणत्याही खोदाईशिवाय पंपाशिवाय निसर्गाच्या वरदस्तामुळे या गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध झालेले झ याचे पाणी या गावासाठी वरदान ठरत आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे टेकड्यांवरील महिलांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो कारण त्या दूरवरच्या भागातून पाणी आणण्यासाठी डोंगरावर आणि खाली तासन्तास चालत असतात. जेव्हा पाण्याचे स्त्रोत मागणी पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा भांडणे होतात. आता गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 10 गावांनी पावसाचे पाणी साठवून केवळ पाणी साठवणेच शिकले नाही तर सह्याद्रीच्या या कोपऱ्यातील मरणासन्न नैसर्गिक झऱ्यांचे पुनर्भरणही केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या शिवलिका राजे म्हणाल्या की, पाणलोट विकास कामावर आधारित कृषी उत्पन्नात वाढ करणे तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हा आमचा उद्देश आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत पाणी टंचाईग्रस्त गाव म्हणून हे शेल, भोगाव घोषित केले आहे. तेथे कृषी उत्पादनाची कमतरता, पाणी टंचाई, पाणी साठवण संरचनेचा अभाव, उपजिविका संधीचा अभाव, लोकसहभागाची कमतरता दिसून आली. त्यातून आम्ही हा प्रकल्प उभा केला व गावकार्यांना त्याचा फायदा होत आहे. ठराविक लोकांकडून कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना विश्वासात घेतल्याने हे काम पूर्णत्वास गेले.

 प्रकल्पाचे फायदे :
– प्रकल्पामुळे 72 एकर जमिनीवर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
– रब्बी पिकामध्ये शेतकर्यांनी तूर, मुग, मठकी, उडीद, या पिकांमध्ये 1200 किलोचे उत्पादन घेतले आहे.
– 84 शेतकर्यांना फळबाग लागवडीकरिता 550 रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
– तसेच 186 ग्रामस्थांचे आधारकार्ड मोबाईल लिंक व 120 ग्रामस्थांचे आभाकार्ड काढण्यात आले.
– परसबाग लागवडीकरिता 80 लोकांना बी-बियाणे वाटप केले. या उपक्रमांतर्गत परसबाग लागवडीतून 2000 ते 2500 रु. उत्पन्न मिळाले.
–  नैसर्गिक जलस्त्रोत्र उपक्रमाअंतर्गत 49 कुटुंबाना पिण्याच्या पाण्याची सोय झाली.

Leave A Reply

Translate »