वैष्णवांच्या मेळाव्यात भक्त टाळ मृदुंगाच्या गजरात नाचू लागला

एमआयटी विश्वशांती दिंडीच्या सौ. उषा विश्वनाथ कराड यांचा अनुभव

पुणे: खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखी हरिनाम अशा भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळाव्यात असंख्य अद्भूत चमत्कार पहावयास मिळतात. पंढरीच्या समचरण पांडुरंगावरची अगाध श्रध्दा आणि निष्ठेचे फळ कशा प्रकारे मिळू शकते याचा एक अद्भूत असा अनुभव पहावयास मिळाला.
हे सर्व अशक्य वाटत असले तरी ही हे सत्य आहे. भक्ताच्या अनुभवाची ही अनुभूती आहे. पांडुरंगाच्या भक्तीत लिन असलेला हा भक्त म्हणजे एमआयटी विश्वशांती दिंडीच्या सौ. उषा विश्वनाथ कराड या आहेत. एप्रिल महिन्यात डॉ. विश्वनाथ दा. कराड सपत्नीक अमेरिकेत पदवी स्विकारण्यास गेले असता. न्यूयाॅर्क येथे सौ.उषा वि.कराड यांना झालेल्या अपघातात त्यांचा पाय फॅक्चर झाला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना किमान १ वर्ष विश्रांती घ्यावी लागेल असे सांगितले होते. परंतू निश्चय, अनंत ध्येयासक्ती ज्ञान, कर्म आणि भक्तीत लीन झालेल्या सौ. उषा वि. कराड यांना पंढरीची वारी खुणवू लागली आणि ज्ञानोबा तुकोबाचे नाव घेऊन पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास घेऊन आळंदी पासून वारी सुरू केली.
या वारीत अक्षरशः चमत्कार घडवा असेच घडले, सौ. उषा विश्वनाथ कराड यांनी व्हिल चेअरवरून उठून पायी वारी केव्हा सुरू केली हे कळलेच नाही. या भक्ताने कोणाच्या ही मदती शिवाय स्वतः व्हिल चेअरवरून उठून टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत पायी वारी सुरू केली. मनात पांडुरंगाला भेटण्याची आस आणि मुखी हरी नामाचा जय घोष करीत स्वतःचे आत्मभान विसरून त्या चक्क पंढरपुरासाठी पायी निघाल्या.

Leave A Reply

Translate »