जो जे वांच्छिल तो ते लाहो…नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वारकऱ्यांसाठी संकल्प

भक्तीमय वातावरण आणि अलोट गर्दीत संतपूजन सोहळा संपन्न

पुणे: वारी आणि वारकरी हा अत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम सोईसुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. वारकऱ्यांसाठी काम करताना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान मधील जो जे वांच्छिल तो ते लाहो, हा संकल्प असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून बुधवारी कोथरुडमध्ये संतपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्नीक वारीतील प्रमुखांचे पाद्यपूजन करुन, आशीर्वाद घेतले. तसेच, वारीसाठी आवश्यक टाळ, मृदंग, तंबू आदी पारमार्थिक साहित्याचे वाटप केले.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, वारी आणि वारकरी हा माझ्यासाठी अत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान मधील जो जे वांच्छिल तो ते लाहो याच भावनेतून वारकरी बांधवांसाठी काम करतो. अशी भावना यावेळी व्यक्त केली.‌

ते पुढे म्हणाले की, वारकरी बांधवांना वारी दरम्यान उत्तमोत्तम सोईसुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासोबतच ज्या वारकरी बांधवांना आपला उत्तरकाळ भगवंताच्या चरणी, हरिनामात व्यतित करण्याची इच्छा आहे, अशा वारकरी बांधवांसाठी लोकसहभागातून श्री क्षेत्र देहू येथे वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. त्याचेही काम सुरू झाले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथेही अशी सुविधा उभारण्याची इच्छा अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली असून, त्यासाठी ही प्रयत्न करत आहे.

संयोजक गिरीश खत्री म्हणाले,आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप आज होत आहे. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.

यावेळी हरी भक्त परायण श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या किर्तन सेवेत उपस्थित सर्वच भक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी केले.

Leave A Reply

Translate »