डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे – गेल्या तेरा वर्षांपासून रुग्णसेवां करीत असलेल्या डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुग्णालयाचा वर्धापनदिन हा जुलै महिन्यात असल्याने सामाजिक बांधिलकी जपत पुढील तीन महिने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालय परिसरात १०० देशी वृक्षांचे रोपण करून तब्बल एक लाख वृक्षारोपण करून “सुजलाम सुफलाम” भारतभूमी निर्मितीसाठीचा संकल्प यानिमित्ताने केला गेला.
यावेळी डॉ दुधभाते नेत्रालयाचे सर्वेसर्वा डॉ. अनिल दुधभाते, डॉ. डिम्पल दुधभाते, प्रियंका एडके, गणेश मोटे, शीतल हिराळकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, महात्मा गांधी विद्यालय खानापूरचे माजी प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जाधव, जेष्ठ शिक्षक भीमराव आदलिंग, इंग्लिश मिडीयम प्री-प्रायमरी स्कूल व ग्रामपंचायत सदस्य अंजना जावळकर, प्रियंका जावळकर, अपेक्षा मोरे उपस्थित होत्या.

नेत्रततज्ञ डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, १३ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या डॉ दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये नेहमीच आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम करण्यात एक पाऊल पुढे असते. रुग्णालयाचे सर्व ५० हुन अधिक कर्मचारी रुग्णसेवा व समाजसेवेसाठी नेहमी कार्यरत असतात. त्यामुळेच रुग्णालयाची घोडदौड यशस्वी चालूच आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्ग चक्र विस्कळीत होत असून झाडे तोडणे  काही मिनिटात शक्य आहे पण तीच सावली आणि पक्ष्यांचे निवास स्थान असलेली विशाल झाडे वाढायला कित्येक वर्षे लागतात हे लहान पानापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. यासाठी वेळीच पावले उचलली गेली पाहिजेत. केवळ याच सद्भावनेतून आम्ही आमचा खारीचा वाट उचलत आहोत. प्राण वायूचा पुरवठा करणारी झाडे मानवी आरोग्यासाठी पण उपयुक्त आहेतच. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वाक्यानुसार निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रदूषण विरहित जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. दुधभाते यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Translate »