पुरंदर परिसरात विमानतळ करायची धमक अमाच्यात आहे – अजित पवार

चाकण : लोकसभेच्या चौथ्या टप्यातील प्रचाराची शनिवारी सांगता झाली. शिरूर मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे, त्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत पुण्यातील समेत चर्चा झाली आहे. पुण्यापासून सासवड, आंबेगाव बुद्रुक, चाकण, देहूरोड, वाघोली आणि उरुळी कांचनपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचा निधी द्यायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेतच, पण केंद्राचा निधी आणण्यासाठी मोदींची मदत लागणार आहे, त्यासाठी मोदींच्या विचाराचा खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव यांना आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची सांगता प्रचार सभा शनिवारी  चाकण येथे पार पडली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मदत केली नसती तर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करता आली असती का? असा सवाल करून डॉ. कोलो यांच्या महामार्गाच्या बाह्यवळण कामाच्या बढ़ायांवर वार केले. बिबट्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जुत्रर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांसाठी विशेष बाब महणून दिवसा थ्री फेज लाइट देण्यासाठी निर्णय केला जाईल असे सांगून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायची गरज पडली तरी चालेल पण हा प्रश्न धसास लावणार असे पवार यांनी सांगितले. तसेच खेड, पुरंदर परिसरात विमानतळ करायचे झाल्यास ती धमक अमाच्यात आहे. नट हे काम करू शकत नाही. ते फक्त डायलॉग मारण्याचे काम करू शकतात असा टोला पवार यांनी कोल्हे यांना लगावला. 

दरम्यान,  २०१९ साली आपण डॉ. अमोल कोल्हे यांना तिकीट देऊन चूक केली असल्याचे सांगितले. माझ्या चुकीची भरपाई यावेळी करायची असून शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

पावसातही सभा गाजवली

चाकण येथे सुरू असलेल्या सभेदरम्यानच पाऊस आला, त्यामुळे सभा रद होईल अशी शंका निर्माण झाली. पावसामुळे मतदार आजूबाजूच्या शेडमध्ये निवान्याला गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रवीण दरेकर उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, रुपाली चाकणकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, प्रदीप गारटकर, शरद बुड़े पाटील महायुतीचे पदाधिकारी भर पावसात व्यासपीठावर बसून राहिले. तर  अजित पवार यांनी आपण शेतकऱ्याची औलाद असल्यामुळे आपल्याला पाऊस हवाच आहे. पाऊस आल्यानंतरच आपली पेरणी होती. त्यामुळे पावसात सभा घेण्यासारखा दुसरा आनंद नाही, अशी भावना व्यक्त केली. तसेच भर पावसातब मार्गदर्शन करीत विकासाचे मुद्दे मांडले.

Leave A Reply

Translate »