देशातलं सर्वोत्तर शहर बनवण्यासाठी रात्रदिवंस काम करेन, मेहनत घेईन – मुरलीधर मोहोळ यांचे पुणेकरांना शब्द

पुणे : आज सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाला भाजप पक्षात एक बुथ प्रमुख काम केलं. आता हा प्रवास कार्यकर्ता ते लोकसभेचा उमेदवार असा झाला आहे. आता या कार्यकर्त्याला केवळ पुण्याचा विकासासाठी लोकसभेत पाठवायचा आहे. तुम्हाला शब्द देतो की, देशातलं सर्वोत्तर शहर बनवण्यासाठी रात्रदिवंस काम करेन, मेहनत घेईन. असा शब्द आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणेकरांना दिला. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सांगता सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यांमध्ये पुणेकरांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आजची ही सभा पाहिल्यानंतर आता विजय कोणाचा आहे ? तो किती मोठा ? हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही माझ्यासारख्या एका सर्व सामान्य खेडेगावातल्या कुटुंबातल्या एका माणसाला ज्यांनी प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं. पुण्यातील नवी पेठमध्ये दहा बाय दहाच्या घरात राहिलो. फक्त भाजप पक्षाच्या विचारांना प्रभावीत होऊन एक कार्यकर्ता, बुथ प्रमुख म्हणून कामाला सुरूवात केली. चारदा पुण्यातल्या या जनतेने आपण मला महापालिकेत काम करायची संधी दिली. त्यानंतर सुरू झालेला प्रवास हा आता पुणे शहराचा लोकसभेचा उमेदवार म्हणून समोर आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी कोविड काळातील एक अनुभव देखील यावेळी सांगितला. त्यावेळी मला आयुक्तांचा रात्री साडेअकरा वाजता फोन आला होता. कोविड काळात पुण्याच्या रूग्णालयात सातशे कोविडचे रूग्णालय होते. त्यांना ऑक्सिजनची खुप गरज होती. त्यांनी सांगितलं की आपल्याकडे एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे. त्यावेळी फोनाफोनी केली. परंतु ऑक्सिजन कुठेच मिळत नव्हते. परंतु थोड्यावेळाने ऑक्सिजनचा टॅंकर आला अन् आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्यावेळी ही काही दुसरी घटना घडली असती तर मी राजकाराण आणि घरदार सोडून कुठेतरी निघून गेलो असतो. परंतु मला लोकांची व्यवस्थित काळजी घेता आली. याचं मोठं समाधान मिळालं.

दरम्यान, ज्यांना पुण्याबद्दल प्रेम आहे. ज्यांना पुण्याचं भविष्य काय आहे हे माहिती आहे. पुण्याचा विकास कसा करायचा आहे ? व्हिजन काय आहे ? त्यांच्या डोक्यामध्ये महायुती आहे. आमच्याकडे मेट्रो आली. आमच्याकडे मेट्रो आली. विमानतळाचा विस्तार झाला. नदीचा प्रकल्प झालाच. कामांच्या यादी सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही. परंतु हे नक्की आहे की पुढच्या काळामध्ये अत्यंत मृर्त स्वरूप आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. असा शब्दही मुरलीधर मोहोळांनी दिली.

Leave A Reply

Translate »