तमाम हिंदूंनो राज ठाकरे फतवा काढतो, महायुतीचे उमेदवारांना भरघोस मतांनी मतदान करा

पुणे : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभा घेतली. सभेच्या आधीच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने राज ठाकरेंची सभा होणार की नाही ? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. मात्र तरीही पुण्यात राज ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी पुण्यातील महायुतीचे आमदारांसह मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या सभेतून राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, हे फतवे काढले जात आहेत. मशिदींमधले मौलवी जर यांना मतदान करा हे फतवे काढत असतील तर मग राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ, भाजपाचे इतर उमेदवार, शिंदेंचे, अजित पवारांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी मतदान करा. अनेकांची चुळबूळ चालू आहे ती कशासाठी? कारण मागच्या दहा वर्षांत यांना तोंड वर काढता आलेलं नाही.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसेचे नेते बाबू वागस्कर, अजय शिंदे, किशोर शिंदे, प्रविण तरडे, श्रीनाथ भिमाले, आदी उपस्थित होेते.

“पुण्यासारख्या शहराने महाराष्ट्राला अनेक विद्वान माणसं दिलीत. जगभरातल्या अनेक कंपन्यांमधील सल्लागार पुणे शहारांनी दिले आहेत. जगभरात शिक्षणाच्या दृष्टीने जगातल्या सर्वात जास्त शिक्षण संस्था, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था पुण्यात आहेत. त्यामुळे अशा शहाराची पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांनी मिळाली आहे. त्यामुळे मी पुण्यात सभा घेतोय. असेही ते म्हणाले.

आजपर्यंत देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मुद्यांवर लढल्या गेल्या. ही पहिलीच निवडणुक आहे, यामध्ये कोणताच मुद्दा नाही. जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व हिंदू बांधवानी एकत्र येऊन मुरलीधर मोहोळ आणि महायुतीची उमेदवारांना मतदान करा असे आवाहन ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

Leave A Reply

Translate »