परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’, अभिनेते प्रवीण तरडे विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.

पुणे : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभा घेतली. सभेच्या आधीच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने राज ठाकरेंची सभा होणार की नाही ? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. मात्र तरीही पुण्यात राज ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी पुण्यातील महायुतीच्या आमदारांसह अभिनेते प्रवीण तरडे देखील उपस्थित होते. यावेळी प्रवीण तरडे यांनी व्यासपाठीवरून दोन मिनिटांच्या भाषणातून विरोधकांवर चांगलीच तोफ डागली.

प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचं कौतूक करत म्हणाले की, “संस्कृतीचं वरदान आहे, त्या माणसासमोर आज बोलावं लागतंय. काही नाही, मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी एवढंच सांगेन, दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करायला हवा.

तसेच यावेळी प्रवीण तरडे यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, माझ्या चित्रपटातील एक डायलॉग घेऊन मी बोलेन, ‘दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जमात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता. या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे. काही उदारणं दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यात घडली त्यावर मान्यवर बोलतीलच, तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना मतदान करण्याचे मशिदीमध्ये फतवे निघत आहेत. परंतु राज्यात अनेक मुसलमान चांगले आहेत, सुज्ञ आहेत. ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना राजकारणात काय चालू आहे ते माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे आज तुम्हाला फतवा काढतो की, माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींनो आणि मातांनो. आज मुरलीधर मोहोळ आणि महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा”.

Leave A Reply

Translate »