दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील या शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारात

पुणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत असून आणखी मतदानाचे आणखी दोन टप्पे बाकी आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतसे महायुतीतील प्रत्येक नेता आपल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होताना दिसत आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारात दिसत असल्याचे चित्र आहे. मात्र, दिलीप वळसे पाटील प्रचारात सहभागी होवू शकत नसल्याने त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारात उतरल्या आहेत.  

पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या, मागील तीस वर्षांपूर्वी आपल्या घरातील मुलं – मुली ही परदेशात जावून शिक्षण घेतील, तेथे नोकरी किंवा व्यावसाय करतील? असा विचार कोणी स्वप्नातही करत नव्हतं. मात्र आता ते शक्य आहे. हे कसं घडलं? आज दुर्गम भागातही इतकी प्रगती कशी झाली? हे शक्य होण्यासाठी आपल्या भागाला दूरदृष्टी असणारे नेते लाभले, हे आपले भाग्य. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच शिवाजीराव अढळराव पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे. आज जमलेले कार्यकर्ते हे त्यांचे सैनिक आहेत. त्यामुळे विकासासाठी शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी येथील मतदारांना केले आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांचा एक अपघात झाला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते महायुतीच्या कोणत्याही प्रचार सभेत दिसत नाहीत. बारे झाल्यावर आपण प्रचारात सहभागी होवू असे त्यांनी सांगितले होते. मात्र, निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने दिलीप वळसे पाटील त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील या शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Translate »