महायुतीची वज्रमूठ, नरेंद्र मोदीच्या सभेमुळे आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची एतिहासिक सभा झाली. यामुळे पुणे, शिरूर आणि मावळ यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. मोदी सरकारचे व्हीजन आणि देशहिताचे निर्णय यामुळे महायुतीचे पारडे जड झाले असून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावर शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुक लढवत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता खेडस, आंबेगाव, जुन्नर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विचारांचे आमदार आहेत. त्यामुळे सहापैकी ४ मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद वैयक्तिकरित्या मोठी आहे. तसेच भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाख मतांचे दीड देण्याचा निर्धार झाला. एकमेव शिरूर विधानसभा मतदार शरद पवारांच्या विचारांचे अशोक पवार आमदार आहेत. मात्र, या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

दरम्यान,महायुतीच्या प्रत्यक पदाधिकाऱ्यांवर टीम नोचा वॉच आहे. प्रत्येक पदाधिकारी त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतो किंवा नाही ? याचा लेखाजोखा प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्याद्वारे अपेक्षित काम न केलेल्या उमेदवारांचा इच्छूकांचा रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आता अंग झाडून कामाला लागले आहे.

महायुतीची वज्रमूठ…

मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केले. “गेल्या ४५ वर्षापासून महाराष्ट्र अतृप्त आत्म्यांची शिकार ठरला आहे,” असा घणाघात केला. महाविकास आघाडीची मदार राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे महायुतीकडून या दोन्ही नेत्यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. दरम्यान, उरळी कांचन येथे शिरुरचे महाविकास आघाडीचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. शरद पवार यांच्या सभेला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. दुसरीकडे, मोदींच्या सभेमुळे महायुतीला मात्र चैतन्य प्राप्त झाले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

अजित पवार तळ ठोकणार…!

बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान ७ मे रोजी पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ ते ४ दिवस अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये तळ ठोकणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील प्रचारामध्ये ‘बोटचेपी’ भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. अद्याप काही ठिकाणी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ‘अॅक्टिव्ह’ झालेले नाहीत. त्याबाबत अजित पवार स्वतः जातीने लक्ष घालतील असे सांगण्यात येते. त्यामुळे आढळराव पाटील यांची ‘बारी’ बसणार, असे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Translate »