महाविकास आघाडीने वंचित ला सोबत घ्यावे; अन्यथा महागात पडेल  – हेमंत पाटील यांचा इशारा

पुणे : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही.  ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी शिवसेना ठाकरे गट, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडी सोबत येण्यास तयार आहे, मात्र महाविकास आघाडी त्यांना सोबत घ्यायला तयार नाही. राज्यात भाजपला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीत वंचित ला स्थान द्यावे अन्यथा महागात पडेल असा इशारा  इंडिया अगेंस्ट करप्शनचे  राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला. 

पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात ताकद आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याने हे बघितले आहे, आजही त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी असते म्हणजेच त्यांच्याकडे हक्काची व्होटबँक आहे, ही बाब महावीकस आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. महाविकास आघाडीने आंबेडकरांना सोबत घेतले नाही तर त्यांना केवळ 6 ते 8 जागांवर समाधान मानावे लागेल.  देश पातळीवर इंडिया आघाडी चांगले काम करत आहे, राज्यात तशीच कामगिरी करायची असेल तर वंचित ला सोबत घेणे गरजेचे आहे.

माझे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन करतो की महाविकास आघाडीला आपले उमेदवार निवडून आणायचे असतील आणि भाजपला रोखायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्या.  वंचित कडे असलेली दलित, ओबीसी मते ही केंद्रातील भाजप सरकारला रोखण्यासाठी आवश्यक आहेत,  अन्यथा आज देशात जे ईडी, सीबीआय चे भूत आहे ते पुन्हा एकदा नेत्यांच्या मानगुटी बसेल, राज्यातील काही नेत्यांचा केजरीवाल होईल हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.  या लोकसभा निवडणूकीत भाजपला रोखले तरच देशाचे संविधान व्हाचेल असेही हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Translate »