सेंटर फॉर युथ डेव्हलमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीज (सीवायडीए) च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त चार दिवसीय महोत्सव

पुणेः सेंटर फॉर युथ डेव्हलमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीज (सीवायडीए) च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात चार दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. चार दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, युवक दिन, उद्योजक शिखर परिषद आणि पानी आरोग्य व स्वच्छता या विषयाचा धागा पकडून कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. युवा नेतृत्व, सामाजिक बांधिलकी, कला आणि संस्कृती या विषयांवर विविध समूह नृत्य, गायन आणि संगीत, पथ नाट्यांचे सादरीकरण करण्यात आले होते.


या प्रसंगी सेंटर फॉर युथ डेव्हलमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीजचे संस्थापक मॅथ्यू मॅटम, येरवडा येथील नगरसेवक अविनाश साळवे, फादर मॅटम, संतोष शहा, अखिलेश साहू, श्रीमती अर्णवाज दमानिया, सीवायडीएचे अध्यक्षा दिलमेहेर भोला, उज्वल चौधरी, कार्यकारी संचालक प्रविण जाधव आणि डॉ. शांताराम बडगुजर उपस्थित होते.
सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम लिखित ‘ट्रेड द रोडलेस ट्रॅव्हल्डः जर्नी इज द डेस्टीनेशन’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच आपल्या कलागुणांनी विविध क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणार्‍या ‘२५ युवकांना यंग अचिवर्स अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.
अविनाश साळवे यांनी सांगितले की,”कोविडच्या काळात संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधाबरोबरच त्यांना मानसिक आधार दिला. देशात प्रथमच या ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले होते.”
सीवायडीएचे संस्थापक मॅथ्यू मॅटम म्हणाले,” युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मनामनात सामाजिक कार्याबद्दल प्रेरित करण्यात येते. त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे ज्ञानाबरोबरच नोकरी मागणारे नाही तर देणारे बनवितो. दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनमान उंचाविण्याचे कार्य संस्थेकडून होते.
प्रविण जाधव म्हणाले, युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम येथे केले जाते. युवकांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न करतो. आम्ही जवळपास ९० हजार विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण दिले, ७ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षण व ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
संतोष शहा म्हणाले, आनंदी आणि चांगले जीवन कसे जगावे याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते.
दिलमेहेर भोला म्हणाल्या, युवकांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन सर्व गुण संपन्न असा नागरिक घडविण्याचे कार्य केले जाते पुढील २५ वर्षात कार्याचा विस्तार संपूर्ण भारतभरात राहील.
यावेळी परभणी येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुभेच्छा देतांना, नंदुरबार सारख्या दुर्गभ भागामध्ये शिक्षण, पाणी, आरोग्य या सारख्या मूलभूत कार्य जे सीवायडीए ने जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Translate »