३ डिसेंबर रोजी १०वी चे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत व्याख्यान

प्रसिद्ध प्रेरक वक्ता व ‘मन करा रे प्रसन्न’ चे सादरकर्ते डॉ. संजय उपाध्ये यांचे मार्गदर्शन.

पुणे: १०वी ते १२वीं च्या बोर्डाच्या परीक्षा काळात फक्त विद्यार्थीच नव्हे तर पालकांबरोबरच संपूर्ण कुटुंब देखील तणावात असते. अशावेळेस जागरूक आणि सजग पालककत्वाच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व आहे.

याच विषयाला अनुसरून कोथरूड येथील सीओईपियन्स अकादमी तर्फे १०वींच्या विद्यार्थ्यांनी ‘ तणावविरहीत अभ्यास कसा करावा’ या विषयावर शहरातील दहावीतले विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ३ डिसेंबर सकाळी ८.३० वा. कोथरूड येथील यशवंतराव नाट्यगृह येथे होणार आहे. प्रसिद्ध प्रेरक वक्ता व ‘मन करा रे प्रसन्न’ चे सादरकर्ते डॉ. संजय उपाध्ये हे विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत.

पाल्यांच्या जडघडणीत आणि सर्वांगीण विकासामध्ये पालकत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची असतेच, पण परीक्षेच्या काळात ही जबाबदारी जास्त काळजीपूर्वक निभावावी लागते. तणाव विरहीत कसे रहावे आणि परीक्षेत यश मिळवून जीवन यशस्वी कसे करावे हा मुख्य उद्देश ठेवून, सदर व्याख्यान सीओईपियन्स अकादमी चे संचालक श्री. शेषाद्री नाईक यांनी आयोजित केले आहे.

Leave A Reply

Translate »