२०४७ मधील भारतीय शिक्षणव्यवस्थेवर मंथन करावेऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांचे मतः

२८वीं तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचा समारोप समारंभ योग गुरु मारूती पाडेकर यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार

पुणे: ” दूरदुष्टीचा विचार करून वर्ष २०४७ मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्था कशी असेल. यावर सर्वांनी मंथन करावे. जागतिक स्तरावरील शिक्षण व्यवस्थेत टिकण्यासाठी आमची स्पर्धा परदेशातील विद्यापीठांशी असेल. त्यावेळी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे.”असे मत केंद्र सरकारच्या एचआरडी विभागाचे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशनचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पद्मभूषण डॉ. दीपक धर, अभिजित पानसे, उद्योजक ईश्वरचंद्र परमार, डॉ. राजेंद्र शेंडे व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य डॉ. योंगेन्द्र मिश्रा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.


तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड व सल्लागार डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
या वेळी योग गुरु मारूती पाडेकर यांचा विशेष जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना म्हणाले. कराड सरांच्या दिव्यदृष्टीने मला डब्ल्यूपीयूत स्थान मिळाले. प्रत्येक व्यक्तीपयर्र्त योग कसा पोहचेल यासाठी कार्य करावयाचे आहे.
डॉ. अभय जेरे म्हणाले,” पंतप्रधान यांनी सांगितल्यानुसार वर्ष २०४७ साली भारताला प्रगत राष्ट्र आणि आर्थिक व्यवस्थेत समृध्द करण्याच्या दृष्टिने कार्य करावे लागणार आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जवळपास ४ बिलियन डॉलर पर्यंत पोहचली आहे. ती जवळपास १० बिलियन डॉलर पर्यंत पोहचवायची आहे.”
“आज जगात गिग इकॉनॉमी हळू हळू सुरू झाली आहे. यामध्ये कर्मचारी दोन ते तीन ठिकाणी कार्य करू शकतो. आता माइक्रोसॉफ्ट बरोबर यूएसमध्ये ही पद्धत सुरू झाली आहे. तर भारतात ती पद्धत यायला वेळ लागणार नाही. गिग इकॉनॉमी मध्ये प्रोजेक्टवर कार्य करावे लागणार आहेत. तेव्हा स्वतःला मजबूत करावे लागेल. पुढील पिढीला खूप कष्ट करावे लागणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीने शिक्षण असावे.”
पद्मभूषण डॉ. दीपक धर म्हणाले,” मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. परंतू त्याच बरोबर अध्यात्माची गरज ही आहे. धर्म हे जीवनात वर्तवणुकीसाठी असतात आजच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाबरोबरच अध्यात्माचे शिक्षण देणे गरजेचे आहे. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ आणि गर्व करू नये समजा हे दोन्ही एकत्र आले तर विनाश होतो. त्यामुळे संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि भगवान गौतम बुद्धांचे पंचशील यांचा समन्वय घडेल तेव्हाच मानवजातीचे कल्याण होईल. तसेच पुढील वर्षापासून डब्ल्यूपीयूच्या प्रत्येक वर्गातील प्रथम व द्वितिय येणार्‍या विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेत समाविष्ठ करून घेऊ.”
आचार्य डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते. त्यामुळे जीवनात निरंकारी बनून सेवेला प्राथमिकता दयावी. परमात्मा बाहेर नाही तर अंर्तमनात असून त्याचा शोध घ्यावा. पवित्र अंतःकरण असेल तर अंर्तमनात शांती सापडेल. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलेल्या अफाट कार्याला पाहता त्यांच्या नावाने रिसर्च सेंटर सुरू करावे.”
ईश्वर परमार म्हणाले,” मानसिक ताण तनाव असेल तर व्यक्तीची प्रगती थांबते. त्यासाठी जीवनात अध्यात्म अत्यंत महत्वाचे असून आपल्या अंर्तःमनात त्याला बसवावे. जीवनाचे लक्ष्य काय आहे हे ठरवून कार्य केल्यास जीवण जगणे अवघड नाही तर अतिशय सोपे आहे. तसेच उत्तम आरोग्यसाठी रोज ८ तास गाढ झोपणे आणि अध्यात्म महत्वाचे आहे.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी आपल्या संदेशात सांगितले की, ही व्याखानमाला सर्वसमावेशक आहे. जाती, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन जीवन जगण्याची आदर्श शैली रुजवण्याचे काम यातून होत आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले हे बीज आज वटवृक्षात परिवर्तन होतांना खूप आनंद वाटत आहे.”
त्यानंतर अभिजित पानसे यांनी विचार मांडले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »